बंगळुरूचा एआय इंजीनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्याच्या कुटुंबाने अतुलची पत्नी निकितावर अनेक आरोप केले आहे. निकिता अतुलचा छळ करायची, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. एक महिन्याआधीच अतुलने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता, असं अतुलच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तसेच अतुलने जीवन संपवण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. 1 तास 2 मिनिट आणि 55 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. अतुल सुभाषने या व्हिडीओतून त्याची राम कहाणी सांगितली आहे. लग्नाच्या आधीपासून ते जीवन संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंतचा त्याचा प्रवास त्याने मांडला आहे. निकिता त्याचा कसा छळ करायची? त्याच्याकडून काय काय डिमांड करायची याची माहितीच त्याने दिली आहे.
या व्हिडीओतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यावरून अतुल कोणत्या मानसिक स्थितीतून जात असेल याचा अंदाज येतो. माझी बायको दिवस रात्र कोरियन ड्रामा, सिनेमे पाहायची. मीही कोरियन ड्रामातील कलाकारांसारखा रोमांटिक व्हावं असं तिला वाटायचं. लग्नाच्यानंतर तिचं वागणं बदललं होतं. त्यामुळेच तिला कामावरून काढून टाकलं होतं. त्यामुळे ती दिवसरात्र घरीच राहायची. तिच्याकडे काहीच कामधंदा नव्हता. त्यामुळे ती फक्त कोरियन ड्रामा आणि सिनेमे पाहायची, असं अतुल सुभाषने म्हटलं आहे.
मी माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. कारण मी इंडियन आहे. मी कोरियन नाहीये. मला कामधंदाही करावा लागतो. निकिताची आईही मला फोन करायची आणि म्हणायाची तू काही कामधंदा करू नको. निकिता जसं सांगेल तसं कर. सुरुवातीला जड जाईल. नंतर सवय पडेल आणि तिच गोष्ट तुला नेहमी करावी लागेल, अशी धक्कादायक माहितीही त्याने दिली आहे.
निकिता घरात कोणत्याच कामाला हात लावत नव्हती. आमच्या घरी कुक यायचा. त्याला मदत करण्यासाठी हाऊस हेल्पही यायची. मला नवरा म्हणून जे जे करायचं होतं ते मी केलं. जेवढं प्रेम द्यायचं तेवढं दिलं. मी स्वत: पत्नीला 13 किलोमीटरपर्यंत ड्रॉप करायला घेऊन जायचो. तसेच ऑफिस सुटल्यावर तिला घ्यायलाही जायचो, असंही अतुलने म्हटलंय. या एक तासाच्या व्हिडिओत त्याने कोर्टातील केस आणि सुनावणी दरम्यान झालेल्या घटनांचाही उल्लेख केला आहे. यात त्याने निकिताचे सर्व कामे आपणच करायचो असंही स्पष्ट केलंय.