भंडारा : भंडारा (bhandara crime news) जिल्हाच्या राष्ट्रीय महामार्गालगत खरबी (नाका) स्मशानभूमीमध्ये (Kharbi (Naka) Cemetery) शुक्रवारी अर्धनग्न स्थितीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोध घेत आहेत. त्या महिलेचा मृतदेह (A woman’s body) सापडून तीन दोन दिवस झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. तीन गायब असलेल्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. परंतु तिन्ही नातेवाईक तिथं येऊन गेले त्यांना ओळख पटलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्या महिलेचा खून झाला असून तिला स्मशानभूमीत आणण्यात आलं आहे.
दोन दिवस झाल्यानंतर ओळख पटलेली नाही, तिचा खून झाल्यानंतर तिला स्मशानभूमीत आणण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी परिसरातील सगळे सीसीटिव्ही फुटेज तपासायला घेतले आहेत.
खरबी (नाका) गावातील स्मशानभूमीमध्ये शेडखाली पांढऱ्या पॉलिथिन पिशवीत अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आधी भंडाऱ्याच्या शवविच्छेदनगृहात पाठविला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंतर नागपूरला रवाना केला. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे. जिल्ह्यात मिसिंगल्या तीन तक्रारी दाखल होत्या. मात्र, संबंधित नातेवाईक ओळख पटवू शकले नाही. या संदर्भात महामार्गावरील टोलनाक्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे सुरू केले असून, सर्व जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांमध्ये या महिलेची छायाचित्रे पाठविली गेले आहेत. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.