Crime Story : मळणीच्या यंत्रात साडी अडकली, बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली, शेवटी…

| Updated on: Feb 21, 2023 | 7:41 AM

लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Crime Story : मळणीच्या यंत्रात साडी अडकली, बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली, शेवटी...
bhandara crime news (
Image Credit source: tv9marathi
Follow us on

लाखांदूर : शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी सापडून एका महिलेचा दुर्देवी मुत्यू झाला. ही घटना भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर (lakhandur) तालुक्यातील दोनाड (donad) गावात घडली आहे. शीतल धर्मशील कोचे असं त्या महिलेचं नाव असून गावात सगळीकडे या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना घडल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस देखिल दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह (woman deadbody) ताब्यात घेतला असून शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विविध पिकांची मळणी सुरु आहे

मृत्यु झाल्याची दर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे घडली. शीतल धर्मशील कोचे वय 52 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद,सोयाबीन,वाटाणा,हरभरा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करणे सुरू आहे.

ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे गर्दी केली

अशातच शीतल धर्मशील कोचे यांच्या स्वतः च्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टर सह मळणी यंत्र सुरू होते. यावेळी शीतल मळणी यंत्र व ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना त्यांची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकून त्यात गुरफडल्याने शितलच यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे एकच गर्दी केली.

हे सुद्धा वाचा

गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. शीतलच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.