Mumbai Crime : अशा घटना तुमच्याही आसपास घडू शकतात… आधी गायब केलं, नंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बदलीत भरला; ‘त्या’ पत्र्याच्या चाळीत काय घडलं?

| Updated on: Sep 16, 2023 | 8:22 AM

आई-वडील कामाला गेल्यानंतर घरात मोठ्या भावासोबत राहणारी चिमुरडी अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही ती सापडलीच नाही. मात्र तेवढ्यात परिसरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शोधले असता..

Mumbai Crime : अशा घटना तुमच्याही आसपास घडू शकतात... आधी गायब केलं, नंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बदलीत भरला; त्या पत्र्याच्या चाळीत काय घडलं?
Follow us on

भिवंडी | 16 सप्टेंबर 2023 : शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसही गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. मात्र असे असले तरी गुन्ह्यांचा आलेख (crime news) चढताच दिसत आहे. गुन्ह्याची अशीच एक धक्कादायक घटना भिवंडीमधून समोर आली आहे. तेथे एका चिमुरड्या मुलीची (minor girl murder) हत्या करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्य बादलीत ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. मात्र ही हत्या नेमकी कोणी व का केली हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

भिंवडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसी पाडा येथील एका पत्र्याच्या चाळी मध्ये ही दुर्देवी घटना घडली. अवघ्या सहा वर्षांच्या या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूच्या या घटनेनंतर नंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुन्हेगाराचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्यात यावी अशी मागणीही नागरिकांतर्फे केली जात आहे.

‘त्या’ चाळीत काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चिमुरडीचे आई-वडील हेदोघेही कामासाठी गोदामामध्ये जातात. 13 सप्टेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. त्यानंतर सहा वर्षांची ती चिमुरडी तिच्या ९ वर्षांच्या भावासोबत घरीच होती. मात्र संध्याकाळी आई-वडील कामावरून घरी परतले असता, त्यांना मुलगी कुठेच आढळली नाही. त्यांनी मुलाकडे याबाबत विचारणा केली असता, बहीण सकाळपासूनच गायब आहे, कुठेच सापडत नाही असे त्यांने सांगितले. हे ऐकल्यावर आई-वडिलांचं धाबं दणाणलं आणि त्यांनी शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे चौकशी करत आजूबाजूला मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली मात्र ती कुठेच सापडली. नाही. अखेर तिच्या आई-वडिलांनी रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत सहा वर्षांची लेक हरवल्याची तक्रार नोंदवली.

मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून लगेचच शोधमोहिम सुरू केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी नजीकच असलेल्या वऱ्हाळा तलावामध्ये सुद्धा पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले, मात्र त्या चिमुरडीचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान परिसरातील नागरिकांना खूप दुर्गंधी जाणवू लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात कसून शोध घेतला असता एका बंद असलेल्या चाळीतील खोलीत प्लास्टिकच्या बकेटमध्ये चिमुरड्या मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले.
ते दृश्य पाहून सर्वच हादरले.

पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवला. जिथे ही घटना घडली तेथे ठाण्यातील ठसे तज्ज्ञांचे पथक दआखल झाले व त्यांनीही काम सुरू केले. कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणी व का केली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असून ठिकठिकाणी रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली.