भिवंडी | 20 सप्टेंबर 2023 : शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे एका महिलेची हत्या (murder news) करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. दुर्गंधी पसरल्याने तीन दिवसानंतर या खुनाचा छडा (crime news) लागला होता. मात्र ही हत्या नेमकी कोणी केली हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला.
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे मधू नावाची एक महिला (वय 35) तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. यापूर्वी तिचा विवाह झाला होता, मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिच्या प्रियकरासोबतच ती घरात राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती राहत असलेल्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जोर लावून दरवाजा उघडला असता त्या महिलेचा मृतदेह किचनमध्ये सापडला. तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती.
तालुक्यातील कोनगाव येथील गणेश नगर शाम बाग मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता, तिचा प्रियकर फरार असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात फरार प्रियकर शबीर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तो अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला मधू आणि आरोपी शब्बीर हे दोघे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. तेथेच त्या दोघांची ओळख झाली व हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांचे अनैतिक संबध निर्माण झाले.
त्यानंतर या दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेश नगर येथील इमारतीत तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली. आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. विशेष म्हणजे हत्या झालेली महिला मधू, हिची अनिता नावाची मैत्रीण देखील तिच्या सोबत राहत होती. 15 सप्टेंबर रोजी मधू व शब्बीर या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले असता शब्बीरने रागाच्या भरात तिचा गळाच चिरला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या दोन्ही हाताच्या नसा कापून तिला ठार केले.
हत्येनंतर त्याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो फरार झाला. मधू हिचीमैत्रीण अनिता हिने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिस ठाण्यात शबिर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.