नवी दिल्ली : कधी कोणाची वासना बदलेल काही सांगता येत नाही. अत्याचाराच्या घटनांमध्ये आता आरोपी हा ओळखीतला किंवा नातेवाईकांमधील निघत असल्याचं अनेक प्रकरणात दिसून आलं आहे. त्यामुळे कधीही डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवताना विचार करायला हवा. सोशल माध्यमांवरील ओळखही अनेकांना महागात पडली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे लहान मुलींना नराधम आता वासनेची शिकार बनवू लागले आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
14 वर्षांची नऊवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी पोटात दुखू लागल्याचं पीडित मुलीने आपल्या आईला सांगितलं. आईने जास्त काही मनावर घेतलं नाही मात्र जेव्हा तिला वेदन सहन होण्याच्या पलीकडे गेल्यावर पीडितेला त्यांनी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांनाही विश्वास बसला नाही. डॉक्टरांची त्यांच्या घरच्यांना सांगण्याची हिंमत होत नव्हती मात्र सांगावं तर लागणार होतं.
डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं त्यावेळी पीडितेच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नऊवीत असणारी पीडिता गर्भवती असल्याचं त्यांना विश्वास ठेवणं कठीण जात होतं. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारलं, तेव्हा पीडितेने सर्व काही सांगितलं.
पीडित आपल्या घरच्यांसोबत 4 महिन्यांआधी टीटीनगर या ठिकाणी तेराव्याला गेली होती. त्यावेळी तिथल्या नातेवाईकांमधील असणाऱ्या आरोपी अंशु पाटवा (वय 18) याने तिला बाहेर फिरुन आणण्याच्या बहाण्याने तिला सूनसान जागेवर एका आड बाजूला नेलं. तिथं तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
आरोपीने घरी येताना तिला कोणालाही काही न सांगायची धमकी दिली. जर कोणाला काही बोललीस तर जीवे मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. पीडितेने सांगितल्यानुसार आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वे गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून तो सध्या फरार झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमधील टीटीनगरमधील आहे.