भुसावळ : रात्रीच्या समयी हायवेला ये-जा करणाऱ्या गाड्यांना रोखून गाडीतील नागरिकांना लुबाडणाऱ्या तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात भुसावळ पोलिसांना यश आलं आहे. भुसावळ पोलिसांनी रविवारी (27 जून) मध्यरात्री ही कारवाई केली. भुसावळच्या नॅशनल हायवे क्रमांक 6 येथे पाच इसम हे हायवेवरील गाड्या अडवून लुटमारीचं काम करण्याच्या तयारीत होते. पण घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आरोपींचा डाव उधळला (Bhusawal police arrest robbers at highway).
भुसावळमध्ये रात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी रात्रीची गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना हायवेवर काही चोरटे गाड्या अडवून नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने वेळ न दडवता नॅशनल हायवे क्रमांक 6 वर धाव घेतील. पोलिसांनी अंत्यंत संयमीपणे ही कारवाई केली (Bhusawal police arrest robbers at highway).
पोलीस हायवेवर ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा तिथे पाच इसम हातात हत्यारे घेऊन लुटमारीच्या तयारीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पाचही जणांकडे लुटमारीसाठी आवश्यक असणारे सर्व हत्यारे होते. पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस आल्याचं कळताच काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पण पोलिसांनी तिघांना पकडलं. तरीही दोन आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत तिवारी (वय 26), अक्षय शामकांत कुलकर्णी (वय 23), आवेश शेख बिस्मिल्ला (वय 20) अशी तीन आरोपींची नावे आहेत. यातील भरत हा नारखेडे शाळेजवळ तापी नगर येथे राहतो. तर अक्षय कुलकर्णी हा आरोपी नारायण नगर तर आरोपी आवेश हा जिया कॉलनी येथे वास्तव्यास आहे. पोलिसांनी मुज्जीमल शेख कलिम (वय 19) यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
संबंधित कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच प्रभारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम 399, 402, 37(1),(3), मुंबई पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
गणेश नाईकांच्या खंद्या समर्थकावर कोयता हल्ला, हातावर वार झेलल्याने संदीप म्हात्रे बचावले
हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात