सोनवणे हत्याकांड प्रकरण! पोलीसांना मोठा पुरावा हाती लागला पण…आणि फोटो शेयर केले…

| Updated on: Sep 22, 2022 | 11:46 AM

नाशिकमधील प्रसिद्ध फर्निचर उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण आणि नंतर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले होते.

सोनवणे हत्याकांड प्रकरण! पोलीसांना मोठा पुरावा हाती लागला पण...आणि फोटो शेयर केले...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील बहुचर्चित सोनवणे हत्याकांड (Murdercase) प्रकरणात नाशिक पोलीसांच्या (Nashik Police) हाती धागेदोरे लागले आहे. सोनवणे यांच्या मोबाइलमध्ये संशयित आरोपींनी चक्क नवे सिम कार्ड घेऊन मोबाइलमध्ये (Mobile) टाकल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र, अद्यापही संशयित आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलीसांनी थेट संशयित आरोपींचे फोटो शेयर करत काही माहिती असल्यास कळवा असे आवाहन करत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी शेयर केला आहे. सोनवणे हत्याकांड प्रकरणात पोलीसांना आरोपी शोधण्यात यश येत नसल्याने पोलीसांनी हतबलता म्हणून की संशयित आरोपींचे फोटो शेयर करत माहिती द्या असे आवाहन केले आहे.

नाशिकमधील प्रसिद्ध फर्निचर उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण आणि नंतर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले होते.

नाशिकच्या सिन्नर जवळील कारखान्यातून तिघांनी कारमधून अपहरण केल्याचे समोर आले होते. त्यानंतर मालेगाव येथील सायतरपाडे कालव्यात मृतदेह आढळून आला होता.

त्यानंतर मालेगाव पोलीसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तोच गुन्हा नंतर नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीतील नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.

नाशिकरोड पोलीसांनी सोनवणे खून प्रकरणाच्या तपासाकरिता एकूण सात पथके तयार करून तपास केला होता. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश येथे देखील पथके आरोपींच्या शोधात होते.

मात्र, तांत्रिक तपासात आरोपींनी सोनवणे यांच्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकल्याचे समोर आल्याने सिम कार्ड खरेदी केले त्या दुकानातून सीसीटीव्हीचा आधार घेत त्यांचे फोटो घेतले आहे.

सीसीटीव्हीचा आधार घेत पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मात्र, आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलीसांनी फोटो शेयर करत आवाहन केले आहे.

संशयितांबाबत माहितीदेण्यासाठी खालील संपर्क वापरण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
नाशिकरोड पोलिस ठाणे – 0253 2465533, 2465133
अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 9920443311
गणेश न्हायदे, गुन्हे निरीक्षक -8108098877
ईमेल आयडी – nashikroad_police@nashikpolice.com