नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२३ : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भाजपाचे आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाला दारू तस्करीत अटक केली. पथकाने भाजपा नेत्याच्या गाडीतून चार कार्टन देशी दारूच्या बॉटल्स जप्त केल्या. भाजप नेत्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आली. दोघांनाही २१ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. बिहारमध्ये दारू बंदीचा कायदा आहे. परंतु, येथे दारू तस्करी केली जाते. गोपालगंजचे भाजपाचे आमदार कुसुम सिंह यांचे दीर अशोक सिंह यांना दारू तस्करीत अटक करण्यात आली. गोपालगंजच्या एसडीएमने त्यांना अटक केली. कुसुम देवी गोपालगंजमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या. ही घटना नगर ठाणा क्षेत्रातील कररीया गावातील आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राकेश कुमार यांनी कारवाई केल्याची माहिती दिली. राकेश कुमार यांनी सांगितलं की, क्रेटा कारने दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तपासणी केली. यादोपूरवरून गोपालगंजला जाणाऱ्या क्रेटा गाडीत त्यांना डिक्कीत दोन गॅलन डिझेल मिळाले.
क्रेटा गाडीतील बोनट खोलल्यानंतर तिथं चार कार्टन देशी दारू लवपली होती. राकेश कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणी पथकाने अशोक सिंह आणि त्यांचे साथीदार हरिकेश शाह यांना अटक करण्यात आली आहे. अशोक सिंह हे भाजपाचे आमदार कुसुम सिंह यांचे दीर आहेत. अशोक सिंह हे भाजपामध्ये सक्रिय आहेत. दारू तस्करीत सक्रिय असल्याची माहिती होती.
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दारू ही उत्तर प्रदेशात तयार झाली आहे. ख्वाजेपूरमध्ये राहणारे आमदार कुसुम सिंह यांचे स्वर्गीय पती सुभाष सिंह हे माजी मंत्री होते. सुभाष सिंह यांच्या निधनानंतर कुसुम सिंह या आमदार झाल्या. अशोक सिंह यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण गरज झालंय.
अशोक सिंह स्वतः भाजपामध्ये सक्रिय कार्यकर्ता आहेत. त्यांची पत्नी ख्वाजेपूरमध्ये सरपंच होती. अशोक सिंह यांच्यावर दारू तक्ररीचा आरोप काही पहिल्यांदा लागला नाही. यापूर्वीसुद्धा गोपालगंज एसडीएम वर्षा सिंह यांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली होती. त्यावेळी वातावरण गरज झालं होतं. आता अशोक सिंह यांना दुसऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या गाडीत दारू तस्करी होत असल्याचं स्पष्ट झालं.