निनाद करमरकर, अंबरनाथ : पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क (business park) या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर (bogus call center) सुरू होतं. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 233 नंबरच्या युनिटमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आलं होतं. या कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांना आपण एक्सफिनिटी कंपनीतून बोलत असल्याचं सांगत त्यांना इंटरनेट सेवा ऑफर, तसंच बक्षीसांची आमिषं दाखवली जायची. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स (debit card and credit card details) मिळवायचे त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जायचे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली. या ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ॲलेक्स डेव्हिड बासरी, मिल्टन मेल्विन मंतेरो, श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकूर आणि पंकज रतनसिंह गौड या पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
त्यांच्यावर फसवणुकीसह कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा सध्या गुन्हे शाखेकडेच आहे. त्यांच्या या बोगस कॉल सेंटरमधून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे ? तसंच त्यांनी लाटलेली रक्कम नेमकी किती आहे? या सगळ्या बाबी आता गुन्हे शाखेच्या तपासात समोर येणार आहेत.
तंत्रज्ञानात जसा बदल होत आहे, त्याचपद्धतीने लोकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. कारण चोरीचं इतर प्रमाण अधिक वाढलं. देशात रोज नव्यानं चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या पाच जणांची पोलिस कसून चौकशी करणार आहे. पोलिसांनी त्या कॉल सेंटरमधून महत्त्वाच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. चौकशीत आणखी बऱ्याचं गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे.