जमुई: पत्नीवर पती आणि मित्राने दारुच्या नशेत बलात्कार केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (Bihar Police) दाखल झाली आहे. काल हे प्रकरण पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये सांगितलं, त्याचबरोबर दोन्ही आरोपीवरती कारवाईची मागणी केली आहे. एका तरुणाने मंदीरात सहा महिन्यापुर्वी लग्न केले(Jamui News). त्यानंतर दोघंही लग्न झाल्यासारखे राहतं होते. तरुण नोकरी करत असल्याची माहिती सुध्दा पोलिसांना सांगितली. ही घटना बिहार (Bihar Crime News) राज्यातील असून या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
दोघेही बोकारोहून जमुई या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर भाड्याने घेतलेल्या घरी ते राहत होते. घरी रात्री उशिरा सिरचंद नवादा मोहल्ला हा पती रमन सिन्हा सोबत आला होता. त्यावेळी पतीसोबत तो सुध्दा दारु पिऊ लागला. रमन सिन्हाने पत्नीचा हात पकडला, त्यावेळी पती म्हणत होता की, काही होणार नाही. त्यावेळी पत्नीने या प्रकाराला विरोध केला, म्हणून रमन सिन्हाने पत्नीला मारहाण केली. त्याचबरोबर दोघांनी बलात्कार केला.
ज्यावेळी रविवारी या घटनेची माहिती पत्नीने घरच्यांना सांगितली. त्यावेळी पत्नीच्या घरच्यांनी तक्रार करण्यास नकार दिला. त्याचबरोबर हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री पतीचे भाऊ आणि वहिणी समजवण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यामुळे पती गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेली होती. पोलिसांनी सगळी माहिती लिहून घेतली आहे. त्याचबरोबर आरोपीचा शोध घेत आहेत.