बिहार : बिहारमध्ये (Bihar Murder News) 18 वर्षीय तरुणीची एकाने घरात घुसून हत्या केली. या खळबळजनक हत्याकांडानंतर (Murder Case) आरोपी चंदीगड (India Crime News) इथं पळून गेला. या आरोपीला आता पकडण्यात आलं असून तपासातून धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपीचं नाव मोहम्मद शारिक असं असून तो विवाहीत असल्याची माहिती समोर आलीय.
चंदीगड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून या हत्येबाबातची समोर आलेली माहिती हादरवून टाकणारी आहे. आरोपी मोहम्मद हा हत्या करण्याच्या उद्देशाने तरुणीच्या घरात शिरला. मुलीच्या नकळत तो तिच्या पाठीमागे आला. त्यानंतर त्याने मुलीचा गळा दाबून तिचा जीव घेतला. हे संतापजनक कृत्य त्याने का केलं, याचं कारणही समोर आलंय.
मोहम्मद शारिक हा हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत प्रेम संबंध ठेवण्यासाठी इच्छुक होता. त्याने या मुलीला तशी विचारणाही केली होती. पण मोहम्मद शारिक हा विवाहित असल्यानं तरुणीने त्याला साफ नकार दिला. पण हा नकार मोहम्मद शारिक याला पचवता आला नव्हता. त्याने रागाच्या भरात मुलीच्या हत्येचाच कट रचला होता.
मोहम्मह शारिक हा मूळचा बिहार येथीर राहणारा असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या बुडैल भागात एक चंपा नावाची महिला आपल्या एका मुला आणि मुलीसह राहायला आली होती. ती भाड्याच्या घरात राहत होती.
चंपाची तरुण मुलगी मोहम्मद शारिक यांच्या नजरेत आली होती. दरम्यान, एक दिवस चंपा काम करुन घरी आली तेव्हा तिने मुलीला आवाज दिला. पण बराच वेळ मुलगी काही उठली नाही, म्हणून तिला शंका आली.
अखेर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तेव्हा या तरुणीला मृत घोषित करण्यात आल्यानं तिच्या आईला मोठा धक्काच बसला. अखेर याप्रकरणी पोलीस तक्रा करण्यात आली आणि फरार आरोपी शारिक याला चंदीगडमधून अटक करण्यात आलीय. आता पुढील कारवाई पोलिसांकडून केली जातेय.