बिहार : एक बातमी बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patana) येथील आहे, आरोपीने महिला हेल्पलाइनची (Woman Helpline) झोप उडवली आहे. हे प्रकरण सोशल मीडिया चॅट आणि ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंग चॅटशी संबंधित आहे. पीडित महिलेने तक्रार देण्यासाठी महिला हेल्पलाईनवर पोहोचून आपला त्रास सांगितल्यावर आरोपीचे कृत्य उघडकीस आले. आरोपी हा फार्मासिस्ट आहे. आरोपीनी माहिती सांगितल्यानंतर हेल्पलाईट सेंटर देखील चक्रावले आहे. आत्तापर्यंत आरोपीने अनेक लोकांना फसवलं आहे.
तो प्रथम मुलींशी मैत्री करतो. त्यानंतर मोबाईलवर बोलतो. हळुहळु त्यांना वेठीस धरायला सुरुवात करतो. मग मुलींशी सेक्स संबंधित चर्चा करायला सुरुवात करतो. त्यानंतर एकदा मुलगी त्याच्या बोलण्यात अडकली की तो तिच्या मोबाईलवरती व्हिडीओ कॉल करायचा. मग त्याच्या खऱ्या कहाणीला सुरुवात व्हायची. असं करून आरोपीने आत्तापर्यंत अनेक मुलींना फसवलं आहे. ज्यावेळी फार्मासिस्टला तरुणाच्या विरोधात पीडीतेने तक्रार दाखल केली. त्यावेळी महिला हेल्पलाईन देखील चक्रावून गेलं आहे. फोनवर मुलींशी बोलायचे जणू ते त्यांच्यासाठीच बनवले आहे. जेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू होते. तो मुलींना कपडे काढायला सांगायचा. मग तो मुलीला उठून चालायला सांगायचा. यादरम्यान तो तिचा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. व्हिडिओचे स्क्रीन शॉट्स घेतल्यानंतर तो मुलींना पाठवायचा. तो त्यांना स्वतःकडे बोलावचा अशी माहिती पीडित महिलेने सांगितली आहे.
अनेक मुलींना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा. आरोपीसोबत काम करणाऱ्या मुलाची बहीण जेव्हा त्याची शिकार झाली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. राहुल कुमार असे आरोपीचे नाव असून तो पाटलीपुत्र परिसरातील एका खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट आहे. पीडित तरुणीने महिला हेल्पलाइनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला हेल्पलाइनने आरोपींना नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी हेल्पलाइन गाठली. त्यानंतर संबंधित मोबाईलची झडती घेतली असता, त्यामध्ये 10 मुलींचे नग्न व्हिडीओ सापडले असून, ते जून आणि जुलै महिन्यातच रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
मैत्रीचे आश्वासन देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो आपले मनसुबे पार पाडत होता. अनेक मुलींसोबत चॅटिंग करतानाही आढळून आला आहे. ज्यामध्ये राहुलने घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरले आहेत. राहुलचा मोबाईलही जप्त करून हेल्पलाइनमध्ये ठेवण्यात आला आहे. पीडित मुलगी पोलिसात तक्रार दाखल करायला तयार नव्हती. त्यामुळे समुपदेशनाच्या माध्यमातून हे प्रकरण सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी आता असे कृत्य करणार नाही असे सांगत आहे. महिला हेल्पलाइनने राहुलला आपल्या कृत्यांपासून दूर राहावे आणि भविष्यात असे केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.