नाशिक : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या ( Nashik Crime News ) घटना वाढत चालल्या आहेत. चालता-बोलता गुन्हा घडत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहीला नाही का? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहे. त्यातच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ( Mumbai Naka Police station ) हद्दीत एक चोरीची घटना चर्चेचा विषय ठरत आहे. लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेला असतांना दुचाकीसह मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. लघुशंकेला गेला आणि एक मिनिट होत नाही तोच माघारी फिरताच दुचाकी आणि मोबाईल ( Bike and Mobile Theft ) नाहीसा झाला. हे पाहून तक्रारदाराला आश्चर्यच वाटले.
एका मिनिटाच्या आत झालेली चोरी चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सिडको मधील शिवशक्ती नगर येथील कपिल प्रदीप सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दुचाकीसह मोबाईलही गेल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कपिल सुर्वे हे लघुशंका कर्णींसाठीं गडकरी चौकाकडून चांडक सर्कल मार्गे सिडकोच्या दिशेने जात होते. एलआयसी कार्यालयाच्या समोरील बाजूने असलेल्या वखार महामंडळ जवळ थांबले आणि रस्त्याच्या कडेलाच लघुशंकेला गेले होते.
रस्त्याच्या कडेला गाडी लावून लघुशंकेला जाणं त्यांना चांगलेच महागात पडले. एका मिनिटाच्या आतचं ही चोरी झाली आहे. त्यामध्ये कपिल सुर्वे यांना आपली गाडी नेमकी कुठं गेली याबाबत काही वेळ कळेना अशी स्थिती झाली होती.
कपिल सुर्वे यांची पॅशन प्रो ही दुचाकी साधारणपने 25 हजार रुपये किमतीची आणि विवो कंपनीचा 11 हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरीला गेला आहे.
दरम्यान, या चोरीची चर्चा होत असली तरी दुसरिकडे नाशिक शहरात दिवसा ढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटना चर्चेचा विषय ठरत आहे. लघुशंकेला थांबलेल्या व्यक्तीलाही फटका बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाढती गुन्हेगारी बघता चालता-बोलता चोरी होऊ लागल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये दाखल असलेले गुन्हे सुद्धा प्रलंबित असल्याने पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण होत आहे.
त्यामुळे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना बघता शहर पोलीस दलाच्या पथकाकडून यापुढील काळात कसा तपास केला जातो हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. त्यात काही क्षणात चोरीला दुचाकी जात असेल तर शहरात दुचाकी चोरी करणारी टोळीतर कार्यरत नाही ना ? हे सुद्धा पोलिसांना शोधावे लागणार आहे.