पंधरा दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला, मात्र ‘या’ कारणाने पुन्हा तुरुंगात गेला

| Updated on: Oct 06, 2022 | 10:59 PM

नंदुलाल भोईर 15 दिवसांपूर्वीच कारागृहातून शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आला. सध्या या आरोपीकडून एक मोटर सायकल हस्तगत केली असून आणखी किती ठिकाणी यांनी अशा प्रकारचे चोरी केली याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला, मात्र या कारणाने पुन्हा तुरुंगात गेला
बाईक चोराला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : सुंभ जळला तरी पीळ जळत नाही ही म्हण कल्याणमधील एका घटनेतून प्रत्ययास आली आहे. शहरात चोरीच्या घटनेत पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लॉक-अपमध्ये केलेला आरोपी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा चोरीच्या मार्गाला लागल्याचे उघडकीस आले आहे. शहरामध्ये चोरी करताना पकडला गेला आणि सुटून आल्यावर रेल्वे पार्किंग परिसरात मोटर सायकल चोरी (Motorcycle Theft) केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून सराईत चोरट्याला पुन्हा बेड्या ठोकत (Arrest) जेलमध्ये रवानगी केली.

नंदुलाल बबन भोईर असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. आरोपीविरोधात कसारा पोलीस ठाण्यात एक तर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

नंदुलाल भोईर 15 दिवसांपूर्वीच कारागृहातून शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आला. मात्र कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली. कल्याण रेल्वेच्या पार्किंगमधून त्याने मोटर सायकल चोरी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाली होती.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरु करत त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शहापूरमधील खातिवली गावातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे आणि अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली.

आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसाच्या माहितीनुसार हा सराईत चोरटा असून, अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्याची विक्री करत होता.

यातून मिळालेल्या पैशाने आपली मौजमजा करत होता. या आरोपीविरोधात कसारा पोलीस ठाण्यात एक तर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्याची नोंद आहे.

सध्या या आरोपीकडून एक मोटर सायकल हस्तगत केली असून आणखी किती ठिकाणी यांनी अशा प्रकारचे चोरी केली याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.