उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, सहारनपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. भाजप नेत्यानं आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेत भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.
योगेश रोहिल्ला असं या भाजप नेत्याचं नाव आहे. योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता असं देखील बोललं जात आहे. मात्र त्याने असं का केलं याचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, पोलिसांकडून देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वीच स्वत:योगेश रोहिल्ला याने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला होता. आपणच आपल्या तीन मुलांवर आणि बायकोवर गोळीबार केल्याचं त्याने म्हटलं होतं. ते एकूण शेजाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे, मात्र त्याने हत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, घटनेबाबत अधित तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, त्याने आपल्या पत्नीवर आणि मुलांवर का गोळीबार केला याचा तपास सुरू आहे. त्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केला, या घटनेत तीनही मुलांचा मृत्यू झाला आहे, तर पत्नीची प्रकृती देखील गंभीर आहे.