BJP leader shot dead : भाजपा नेत्याची घराबाहेर गोळ्या घालून हत्या, थरार कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Aug 11, 2023 | 11:34 AM

बाईकवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी संभलमधील भाजप नेत्याची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली.

BJP leader shot dead : भाजपा नेत्याची घराबाहेर गोळ्या घालून हत्या, थरार कॅमेऱ्यात कैद
भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
Follow us on

मुरादाबाद | 11 ऑगस्ट 2023 : उत्तर प्रदेशातील संभलच्या असमोली ब्लॉक प्रमुखपदाची निवडणूक लढवणारे भाजप नेते (bjp leader) अनुज चौधरी यांच्या निर्घृण हत्येने (shot dead) खळबळ उडाली आहे. भावासह घराबाहेर फेरफटका मारत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या (murder) करण्यात आली. मुरादाबादमधील जनपद येथे ही दुर्दैवी घटना घडली असून ती डोळ्यांदेखत पाहणाऱ्या साक्षीदारांनी केलेल्या वर्णनाने अंगावर काटात येतो.

अनुज चौधरी हे सध्या मुरादाबादच्या मझोला भागातील एका अपार्टमेंट मध्ये रहात होते. गुरूवारी संध्याकाळी ते त्यांच्या भावासोबत अपार्टमेंटच्या बाहेरच रस्त्यावर फेरफटका मारत होते. तेवढ्याच बाईकवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याने त्यांचा भाऊही घाबरला. त्याने अनुज यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ला केल्यानंतर तीनही मारेकरी तेथून फरार झाले. हा संपूर्ण प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून पोलिस ते फुटेज तपासून हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

25 ऑगस्टला आणणार होते अविश्वास प्रस्ताव

अनुज चौधरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वतंत्रता देव सिंह यांच्या जवळचे मानले जायचे. ते लवकर अविश्वास प्रस्ताव आणणार होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याआधीच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अनुज चौधरी हे किसान मोर्चाशी देखील संबंधित होते, त्यामुळे या घटनेनंतर भारतीय किसान युनियनशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनुज चौधरी यांनी 2021 साली संभलच्या असमोली ब्लॉक येथून ब्लॉक प्रमुखाची निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून अनुजचे काही लोकांशी वैर होते असे सांगितले जात आहे. 25 ऑगस्ट रोजी अनुज चौधरी सध्याच्या ब्लॉक प्रमुखांसंदर्भात एक प्रस्ताव मांडणार होते, ज्याची बरीच चर्चा सुरू होती.