पालघर : महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad highway) ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. (Body found in a PPE kit on the side of the Mumbai Ahmedabad highway near Palghar)
महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, घटनास्थळीच पोस्टमार्टेम करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिकडे बारामतीत बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे. बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली.
संबंधित बातम्या
बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्णाचा मृत्यू, बारामतीत चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
फ्रान्समध्ये पुन्हा हादरले; दहशतवाद्यांची पोलिस ठाण्यात घुसखोरी, महिला अधिकाऱ्याचा गळा चिरला
(Body found in a PPE kit on the side of the Mumbai Ahmedabad highway near Palghar)