गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 19 जानेवारी 2024 : आपली वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख आहे असे भासवून महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका भामट्या गुरुजीला बोरीवली पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. हा आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी आहे. त्याने अनेकांना आपली मोठी ओळख असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स धाडले होते. परंतू आरोपी पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. त्याच्यावर तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी पाळत ठेवली होती. अखेर अयोध्येला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला सुरत येथून काल अटक केल्याचे बोरीवली पोलिसांनी म्हटले आहे.
आपली वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपींशी ओळख असल्याचे सांगून महिलांसह अनेकांची फसवणूक करणाऱ्या गुरुजी ऊर्फ ऋृषी पांडे याला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी ऋृषी पांडे याने पोलिसांच्या समन्सला उत्तर न देता गुजरात आणि उज्जैन येथे पलायन केले होते. त्याला अयोध्येला जाण्यापूर्वीच सुरत येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी गुरुजी ऊर्फ ऋषी पांडे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असून तो मुंबई्च्या कांदिवली- चारकोप येथे रहात होता. आरोपी पोलिसांच्या चौकशी हजर न राहता मथुरा, गुजरात, सोमनाथ. उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच बोरिवली पोलिसांनी त्यासा गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे. आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहे.
मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषि पांडे याला महिलेच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी बनून आपली अनेकांसोबत ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच बोरिवली पोलिसांनी त्याला गुजरात येथून अटक केली आहे.
साल 2019 मध्ये एका महिलेला तिच्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल कारवाई टाळण्यासाठी गुरुजी ऊर्फ ऋषि पांडे यांने कारवाई टाळण्याचे आश्वासन दिले. आपली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवून त्याने या महिलेकडून तब्बल 2,40,000 रक्कम लुबाडली. या महिलनेने तक्रार केल्यानंतर या आरोपीच्या मागावर पोलिस होते. आणखी कोणाची या फसवणूक केली आहे याचा तपास सुरु असल्याचे बोरीवली पोलिसांनी सांगितले.