सिंधुदुर्ग – दोडामार्ग (Dodamarg) येथील कुडासे (Kudase) गावातील नदीत बुडून मामा भाचीचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे. सहलीला गेल्यावर नदीत केलेली आंघोळ जीवावर बेतली आहे. मावस बहीण अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ताळगाव येथील ऍड विजय पालयेकर(Vijay Palayekar) यांनी कुडासे भागात जमीन खरेदी केली होती. जमीन पाहणे व सहलीचा उद्देश साध्य करणे म्हणून ऍड पालयेकर त्यांचे कुटुंब तसेच इतर नातलग मिळून 22 लोक शनिवारी दुपारी कुडासे येथे आले होते. ऍड पालयेकर त्यांची मावस बहीण, भाची आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंघोळीसाठी तिघेजण उतरले त्यावेळी तिथं पाणी जास्त होते. तसेच नव्याने आंघोळीला उतरलेल्या तिघांना तिथल्या पाण्याचा अंदाज नव्हता. अचानक त्याचवेळी 13 वर्षाची भाची तनीषा पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने बहिणीला सुरक्षित जागेवर ठेवून पालयेकर भाचीला वाचवण्यासाठी धावले. मात्र भाचीला वाचवण्यासाठी गेलेले पालयेकरही बुडू लागले. सोबतच्या नातलगांनी आरडा ओरड करताच जवळचे काही लोक धावत आले. त्यांनी मामा भाचीला नदीत उडी मारून बाहेर काढले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मामा भाचीचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सहलीला गेलेल्या कुटुंबासोबत अशा अनेक घटना घडल्या आहेत. कारण कुठे नवीन ठिकाणी गेल्यानंतर अनेकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा घडना घडल्या असल्याचं समोर आलं आहे. तसेच अशा घटनामध्ये दोघा तिघांचा मृत्यू झाला आहे. दोडामार्ग येथे घ़डलेल्या घटनेत जिथं मामा भाची बुडाली आहे. तिथं खड्डा आहे. दोघांनाही पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली आहे.
काही नातेवाईकांनी दोघांनाही बाहेर काढले. परंतु तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.