मध्य प्रदेश : इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांत लव जिहाद सारख्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, एका तरुणाने आपला धर्म लपवून एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या तरुणीला धर्मपरीवर्तन करण्यासाठी बळजबरी केली जात होती. धर्मपरीवर्तन करुन माझ्याशी लग्न कर, अशी धमकी या तरुणीला देण्यात आली होती. त्यानंतर या तरुणीवर बलात्कारही करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणातील आरोपी फरार आहे. पण आता पोलिसांनी या घटनेप्रकरणी तक्रार दाखल करुन गुन्हाही नोंदवून घेतलाय.
इंदूरच्या हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीची अन्नू नावाच्या मुलाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. नंतर या मुलाचं नाव अन्नू नसून अनवर असल्याच पीडितेला कळलं. पण तोपर्यंत ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली होती. अखेर या तरुणीला धमांतरण करण्याची धमकी देत लग्नासाठी अनवर याने दबाव घातला. तसंच तिच्यावर बलात्कार करुन तो फरार झाला, अशा आरोप पीडितेन तक्रारीत केला आहे.
पीडितेनं हा तरुण धमकावू लागल्यानंतर सगळा प्रकार घरातल्यांना सांगितलं. तेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे.
पीडितेचं लग्न महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीशी ठरवण्यात आलं होतं. तिच्या कुटुंबीयांनी हे लग्न ठरवलं होतं. महाराष्ट्रातील मुलाशी पीडितेचं लग्न होणार असल्याचं अन्नू उर्फ अनवर याला कळलं. तेव्हा तो अचानक तो तिच्या घरीच धडकला.
जेव्हा पीडितेच्या घरी कुणीही नव्हतं, तेव्हा अनवर याने पीडितेला धमकावलं. धर्मपरीवर्तन करुन माझ्या लग्न कर, असा इशारा दिला. त्यानंतर तिच्यावर गैरकृत्य करत तो तिथून फरार झाला.
आता पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणीही केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात बजरंग दलाच्या वतीने लव जिहाद विरोधी मोहीम राबवली जातेय. त्यासाठी शोध पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातूनही लव जिहार सारखे प्रकार उघडकीस आल्याच्या घटना समोर आल्या होत्या.