वसई / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे उद्यावर येऊन ठेपला आहे. आपल्या प्रियसीला काय गिफ्ट द्यायचे या चिंतेत अनेक प्रियकर आहेत. मात्र वसईतील एका अतिउत्साही प्रियकराने नामी शक्कल लढवत प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी चक्क इलेक्ट्रिक मोटारसायकलचीच चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेत माणिकपूर पोलीस ठाण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 5 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकलही जप्त केल्या आहेत. चंद्रेश पाठक असे अटक आरोपी प्रियकराचे नाव आहे.
चंद्रेश पाठक हा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालेला आहे. नायगाव स्टेशनजवळ पार्क केलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे माणिकपूर पोलिसांनी चोरट्यावर लक्ष केंद्रित केले होते. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चंद्रेश पाठक याला दहिसर परिसरातून अटक करण्यात आली.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने व्हॅलेन्टाईन डे ला आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी मोटारसायकलची चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या चोरट्या प्रियकराकडून 3 लाख 90 हजार किमतीच्या 5 मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत करून दोन गुन्हे उघड केले आहेत.
मालेगाव शहरातील मोटार सायकली चोरीचे प्रमाण वाढले असून, आता पोलिसांनी चांगलेच मनावर घेतले असल्याचे दिसून येत आहे. मालेगाव शहर आणि परिसरातून मोटारसायकली चोरणाऱ्या तिघांना मालेगाव कॅम्प पोलिसांनी अचक केली आहे.
आरोपींकडून आतापर्यंत 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी चोरलेल्या मोटारसायकली मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लवकरच जप्त केलेल्या मोटार सायकली मूळ मालकांना परत केल्या जातील.