पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकचा ब्रेक फेल, सुसाट ट्रक पाहून लोकांनी डोळे झाकले

| Updated on: May 12, 2023 | 9:58 AM

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नेहमी अपघात झाल्याचं आपल्याला व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतं. काही अपघात इतके भयानक असतात की, लोकांना पाहताक्षणी घाम फुटतो. सध्या तशाचं पद्धतीचा एक अपघात झाला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकचा ब्रेक फेल, सुसाट ट्रक पाहून लोकांनी डोळे झाकले
mumbai pune highway
Image Credit source: tv9marathi
Follow us on

बोरघाट : पुणे-मुंबई द्रुतगती (pune mumbai highway) मार्गासगळवर पुन्हा एकदा ट्रकचा (Truck Accident) ब्रेकफेल झाल्यानं अपघात झाला आहे. बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल (brake fail) झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास खोपोली (Khopoli) परिसरात झाला. हा अपघात ज्यावेळी झाला, त्यावेळी तिथं अपघात पाहणारी लोकं प्रचंड भयभीत झाली होती. गाडीचा ब्रेक फेल झाल्याची माहिती प्रवाशांना झाल्यानंतर अनेकांनी सुसाट ट्रक पाहून डोळे सुध्दा झाकले होते अशी माहिती मिळाली आहे.

ट्रकचा असाच ब्रेकफेल झाला होता

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत. 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाला होता. विचित्र अपघात पाहून त्यावेळी सुध्दा अनेकांना घाम फुटला होता.

वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या वाहनांची रांग किती लांब आहे, हे स्पष्ट होतंय. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रक एका बाजूला केल्यानंतर रस्ता मोकळा झाला

पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने एकाबाजूला करण्यात आला आहे. रस्त्यावर सगळीकडे काचा पडल्या आहेत. तिथं सकाळी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. परंतु ट्रक एका बाजूला केल्यानंतर रस्ता मोकळा झाला.

शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी या रस्त्यावर अधिक ट्रॅफिक असतं. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेकजण