मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी टॅक्सी बूक केली, पण ड्रायव्हरने उधळून लावला डाव ! असा लागला मारेकऱ्यांचा शोध

| Updated on: Jul 18, 2023 | 11:57 AM

संपत्तीसाठी महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारेकरी करत होते, मात्र टॅक्सी ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्लान फसला आणि पोलिसांनी त्या सर्वांना अटकही केली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी टॅक्सी बूक केली, पण ड्रायव्हरने उधळून लावला डाव ! असा लागला मारेकऱ्यांचा शोध
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Follow us on

कानपूर : एका महिलेची हत्या (murder) करून तिचा मृतदेह ओला कॅबमधून (cab) नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. चालकाच्या (taxi driver) सतर्कतेमुळे त्यांचा प्लान फसला अन् ते पोलिसांच्या हातात सापडले. संपत्तीच्या लोभापायी हा खून करण्यात आल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही खळबळजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 40 कोटी रुपयांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसाठी कुसुम कुमारी या महिलेची तिच्याच दोन नातेवाईकांनी हत्या केली. महिलेचा दीर आणि अन्य नातेवाईकांनी 11 जुलै रोजी नोएडा येथून उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील गावात जाण्यासाठी ओला टॅक्सी बूक केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा प्लान होता. पण ते डिक्कीत मृतदेह ठेवत असताना त्यातून रक्त गळत असल्याचे टॅक्सी चालकाने पाहिले. त्यानंतर त्या टॅक्सी चालकाने प्रवाशांना घेऊन जाण्यास नकार दिला असता दोघांनी त्याला शिवीगााळ करण्यास सुरूवात केली. तेव्हा टॅक्सी चालकाने तातडीने तेथून पळ काढला आणि महामार्गावर तैनात असणाऱ्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने महाराजपूर येथील पोलिसांशीही संपर्क साधला.

हत्येनंतर आरोपींना लावायची होती मृतदेहाची विल्हेवाट

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, कुसुम ही पीडित महिला आणि तिचा दीर सौरभ हे जवळच्या गावातून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. कुसुमला महाराजपूरला आणण्यासाठी आरोपींनी नोएडाहून कॅब बूक केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. कुसुमला मारण्यासाठी सौरभने त्याच्या आणखी एका साथीदाराला आधीच महाराजपूर येथे बोलावले होते. 11 जुलै रोजी त्या दोघांनी कुसुमची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गोणीत टाकून टॅक्सीच्या डिक्कीत टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र टॅक्सी चालक मनोज याने मृतदेह भरलेली गोणी डिक्कीत ठेवतानाच त्यातून रक्त गळत असल्याचे पाहिले आणि आरोपींचा प्लान उधळून लावला. त्याने तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुसुम यांचा मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. कुसुम यांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.