त्याला वाटायचे वहिनी आपल्यावर काळीजादू करतेय, मग त्याने जे केले त्यानंतर कुटुंबाचा आधारच गेला !

| Updated on: May 05, 2023 | 4:42 PM

दिराला वाटायचे वहिनी आपल्या जादूटोणा करतेय, म्हणून आपण आजारी आहोत. त्याच्या या संशयामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले अन् जे केले त्यानंतर एकच खळबळ उडाली.

त्याला वाटायचे वहिनी आपल्यावर काळीजादू करतेय, मग त्याने जे केले त्यानंतर कुटुंबाचा आधारच गेला !
जादूटोण्याच्या संशयातून दिराने वहिनीला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

ग्वाल्हेर : ग्वाल्हेरच्या मुरार परिसरातील बेपत्ता महिलेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. दिराने महिलेची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेह बेतवा नदीत फेकला. याप्रकरणी मुरार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्याम पाठक असे अटक आरोपीचे नाव आहे. वहिनी कुटुंबावर तंत्रविद्या करते असा दिराला संशय होता. यातूनच त्याने मित्राच्या मदतीने वहिनीची हत्या केली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार मुरार पोलीस बेतवा नदीत महिलेच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

महिला अचानक बेपत्ता झाली

ग्वाल्हेरच्या मुरार परिसरात राहणारी रेणू पाठक 17 एप्रिल रोजी अचानक गायब झाली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुरार पोलीस ठाण्यात नोंदवली. रेणूच्या पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले होते. तसेच तिचे कुणाशी वैरही नव्हते. पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरु केला. तपासादरम्यान महिला शेवटची तिच्या दिरासोबत दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दिराला ताब्यात घेतले

पोलिसांनी संशयाच्या आधारे श्याम पाठक याला ताब्यात घेऊन चौकशी केली. श्याम सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करत होता. पण पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. वहिनी जादूटोणा करायची. त्यामुळे तो सतत आजारी रहायचो. कुटुंबही चिंतेत असायचे. यामुळे घरातील वातावरण बिघडले होते. म्हणून आपण वहिलीचा काटा काढण्याचे ठरवले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. यासाठी त्याने त्याचा मित्र राजूला मदतीसाठी तयार केले.

हे सुद्धा वाचा

श्याम रेणूला 17 एप्रिल रोजी ट्रकमधून झाशी, ललितपूर मार्गे बेतवा पुलावर घेऊन गेला. तेथे त्याने आधी वहिनीची हत्या केली. मग मृतदेह बेतवा नदीत फेकून दिला. आरोपीने दिलेल्या माहितीवरुन पोलीस बेतवा नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. आरोपीला अटक केली असून, पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.