चांदीचे कडे निघत नसल्याने महिलेचे पाय तोडून नेले; दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले

| Updated on: Sep 03, 2022 | 12:11 AM

दरोडेखोरांनी या महिलेच्या पायातून चांदीचे काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण कडे काही निघाले नाहीत. अखेरीस दरोडेखोरांनी महिलेचे पाय धारधार शस्त्रांनी तोडले आणि आपल्या सोबत नेले. काही अंतरावर गेल्यावर दरोडेखोरांनी कडे काढून घेतले आणि महिलेचे पाय फेकून दिले.

चांदीचे कडे निघत नसल्याने महिलेचे पाय तोडून नेले; दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले
उत्तर प्रदेशात पतीकडून पत्नीची हत्या
Follow us on

बूंदी : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचे पाय तोडल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये(Rajasthan) घडली आहे. चांदीचे कडे चोरण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी या महिलेचे पाय तोडले आहेत. दरोडेखोरांचा क्रूरपणा पाहून पोलिसही हादरले आहेत.
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या पायातील चांदीचे कडे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडे पायातून निघत नसल्याने दरोडेखोरांनी या पहिलेचे पाय कापून नेले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थान बुंदीच्या नैनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावात हा प्रकार घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 80 वर्षीय वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती. काही दरोडेखोर चोरीच्या उद्देशाने या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी घरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, चोरी करणाऱ्यासारख काहीच त्यांना मिळाले नाही. अखेरीस त्यांची नजर महिलेच्या पायातील चांदीच्या कड्यांवर गेली.

दरोडेखोरांनी या महिलेच्या पायातून चांदीचे काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण कडे काही निघाले नाहीत. अखेरीस दरोडेखोरांनी महिलेचे पाय धारधार शस्त्रांनी तोडले आणि आपल्या सोबत नेले. काही अंतरावर गेल्यावर दरोडेखोरांनी कडे काढून घेतले आणि महिलेचे पाय फेकून दिले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.  श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा माग काढला जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.