बुलडाणा : साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळानं घाला घातलाय. मारुती सुझुकीची अल्टो कार आणि एक ट्रॅव्हल्सची बस (Alto car & travel’s bus Accident) यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू (3 people killed) झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघाताच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेहकर आणि डोनगाव रोडवर (Buldana Mehkar and Dongaon Road) हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले सगळेजण चाळीसगावातील असल्याची माहिती मिळतेय. अपघाता मृत्यू झालेल्या सर्व जण चाळीसगावमधील असल्याची माहिती मिळतेय. दिग्रसाल इथं साखरपुड्यासाठी हे लोक चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातातील मृतांची नावं कळू शकलेली नाहीत.
नागपूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघे ठार झाल्यात. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. ट्रॅव्हल्स बस आणि अल्टो कार मध्ये हा अपघात झाला. नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणारी MH 40 BL 7061 ट्रॅव्हल्स अल्टो कारला धडकली. MH 06 5134 क्रमांकाची अल्टो कार चाळीसगाववरुन डीग्रसला जात होती. मात्र शनिवारी सकाळी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराजवळ या दोन्ही गाड्याची समोरा समोर जोरदार धडक झाली.
या अपघातामध्ये इंदल चव्हाण, योगेश विसपुते आणि विशाल विसपुते या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर चव्हाण आणि मिथुन चव्हाणसह आणखी एक जण युवक जखमी झाला. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार नंतर औरंगाबाद येथे उपचारसाठी हलविण्यात आलं. अल्टो कार मधील 5 नातेवाईक डीग्रसला साखरपुडा करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.
1) इंदल चव्हान ..वय 38
2) योगेश विसपुते, वय..32
3) विषाल विसपुते..वय.38
तीन दिवसांपूर्वीच बुलडाण्यात भीषण अपघात झाला होता. त्याही वेळी तिघांचा मृत्यू झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर आल्यानं भीषण अपघात झाला होता. या अपघातात 3 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, वाढते रस्ते अपघात थांबवायचे असे, असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतोय. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वाढलेल्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जातेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्ते अपघातात होणाऱ्या बळींची संख्या ही चिंतेचा विषय असल्याचं संसदेत बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, राज्यातील रस्ते अपघात थांबायचं नाव घेत नसल्यांचं बुलडाण्यातील अपघातामळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.