दहावीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर संस्थेची कारवाई, पोलिस अजून…

| Updated on: Feb 28, 2023 | 8:11 AM

बुलढाणा तालुक्यातील कोलवड शिवारात असलेल्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या धर्मेंद्र उत्तम हिवाळे या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर संस्थेची कारवाई, पोलिस अजून...
buldhana
Image Credit source: Google
Follow us on

गणेश सोलंकी, बुलढाणा : प्रॅक्टिकलच्या मार्कांची धमकी देऊन दोन विद्यार्थी मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळेला राजीव गांधी मिलिटरी स्कूल (Buldhana School) व्यवस्थापनाने एका आदेशाद्वारे बरखास्त करीत असल्याच जाहीर केलं आहे. मुलांचे लैंगिक शोषण तसेच शाळेची प्रतिमा मलीन केल्याबद्दल शाळेने शिक्षकावर (student) ही कार्यवाही केली आहे. तर काल जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा पोलिसांनी (buldhana police)आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळे विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शेवटी संस्थेने निर्णय घेतला

आरोपी शिक्षक फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. पीडित विद्यार्थ्यांचे लिखित तक्रार अर्ज, पालकांचे व्यवस्थापनाला लिहिलेले पत्र, शाळेने नेमलेल्या त्री सदस्य समितीचा अहवाल, तर शाळा समितीचा 25 फेब्रुवारीचा ठराव, अशा विविध प्रक्रियेतून संस्थेने आरोपी शिक्षक धर्मेंद्र हिवाळेला प्रशासकीय नियमानुसार काढून टाकण्यात आले आहे.

आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना…

बुलढाणा तालुक्यातील कोलवड शिवारात असलेल्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या धर्मेंद्र उत्तम हिवाळे या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून पीडित विद्यार्थ्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे. आरोपी धर्मेंद्र हिवाळे हा सध्या फरार असून आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत तर आरोपी शिक्षकावर संस्थेकडून बडतर्फ करण्यात आले आहे अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी, सचिन कदम यांनी दिली.

हे सुद्धा वाचा