जेसीबी पलटला, तरुण खड्ड्यात असल्यामुळे लोकांनी धावाधाव केली, दुसरा जेसीबी येईपर्यंत…

| Updated on: Jun 11, 2023 | 8:38 AM

शेतीचं काम सुरु होतं, त्याचवेळी शेतीतं पाणी अधिक साचू नये, यासाठी शेताच्या बाजूने एक चर काढण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी अचानक जेसीबी पलटी झाला. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी जोराचा आरडाओरडा केला. कारण जेसीबी खाली तरुण दबला होता.

जेसीबी पलटला, तरुण खड्ड्यात असल्यामुळे लोकांनी धावाधाव केली, दुसरा जेसीबी येईपर्यंत...
buldhana news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश सोलंकी, बुलढाणा : जेसीबीच्या (JCB NEWS) खाली दबून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे बुलढाणा (buldhana crime news in marathi) जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाच बहिणींमध्ये एकच भाऊ असल्याने गावातील लोकांना अश्रू अनावर झाल्याचं चित्र काल लोकांना पाहायला मिळालं. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी तरुण सांभाळत होता. तरुण शेतकरी अक्षय देशमुख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नावं आहे. महाराष्ट्रात (maharashtra) सध्या अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीची कामांचा जोर वाढला आहे. अक्षय शेतातील काम करीत असताना दुर्घटना घडली आहे. अक्षयचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

घरातील सर्व जवाबदारी त्याच्यावरचं होती

पिकात पावसाचे पाणी शिरून पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी उमरा देशमुख येथील तरुण शेतकरी अक्षय देशमुख हा आपल्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने एका बाजूने पाणी जाण्यासाठी नाला खोदत होता. त्यावेळी जेसीबी पलटी होऊन अक्षय त्याखाली दबून गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन निघाले होते, त्याचवेळी त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. अक्षय देशमुख असं त्या तरुणाचं नाव असून, त्याचं वय 17 आहे. त्याच्याकडे दोन एकर शेती होती. घरातील सर्व जवाबदारी त्याच्यावरचं होती.

हे सुद्धा वाचा

त्या जेसीबी खाली दबला गेला

पावसाळ्याचे पाणी शेतात शिरून पिकाचे होणारं आहे. त्यामुळे अअक्षयने जेसीबीच्या साहाय्याने बांधावर नाला खोदण्याचे काम सुरु केले होते. मात्र नाला खोदण्याचे काम सुरु असताना अचानक जेसीबी पलटी झाला. अक्षय त्या जेसीबी खाली दबला गेला. याची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यावर दुसरा जेसीबी पलटी झालेल्या जेसीबीला काढण्यासाठी बोलावण्यात आला. अक्षयला बाहेर काढला, त्यावेळी अक्षयची परिस्थिती गंभीर असल्याची लोकांनी पाहिली. लोकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. परंतु वाटेतचं त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर पाच बहिणी आणि त्याच्या आईची जबाबदारी त्याच्यावर होती. अक्षयचा अचानक मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांना सुध्दा धक्का बसला आहे.