बुलढाणा : खामगाव (Khamgaon) तालुक्यातील चितोडा (Chitoda) येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास मोटर सायकलचा (Motorcycle) धक्का लागल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन काही जण जखमी झाल्याची घटना घडली. खामगाव ग्रामीण पोलीस (police station) ठाण्यात दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख रिहान शेख अहमद याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तर दुसऱ्या तक्रारीत गौतम महादेव तिडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख रीहान शेख अहमद यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी हे मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असून परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्री ९ वाजता एका मोटारसायकलचा धक्का लागला, त्यामुळे तिथं दोन्ही बाजूची लोकं जमा झाली. दोन्ही ग्रुपमध्ये बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तिथली गर्दी पांगवली, त्यानंतर त्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटातील बाजूकडून तिथं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस कोणावर काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. काल रात्री अचानक झालेल्या गोंधळामुळे गावात घबराहट पसरली होती.