फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू

| Updated on: Mar 07, 2022 | 3:42 PM

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एका कार्यकर्त्याने चप्पल भिरकावली होती. त्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्याचा शोध सुरू केला आहे.

फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Image Credit source: Tv9
Follow us on

पुणे : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाडीवर एका कार्यकर्त्याने चप्पल भिरकावली होती. त्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल (Pune Crime) झाला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्याचा शोध सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चप्पल फेकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर चिखली पोलिसात (Pune Police) दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. कलम 336 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे, त्यामुळे लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. काल पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर होते. त्यासाठी फडणवीसांसह राज्यातले अनेक नेतेही पुण्यात होते. त्यानंतर हा प्रकार घडला होता. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

चप्पल फेकीनंतर फडणवीस काय म्हणाले?

चप्पल फेकीच्या प्रकारानंतर फडणवीस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करताना दिसून आले. चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (NCP) फटकारलं आहे. स्वतः काही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये असूया आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रोहित पवार यांनीही कान टोचले

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून फडणवीसांच्या कारवर चप्पल भिरकावणाऱ्याचे कान टोचले आहेत. फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे चप्पल फेकणे योग्य नाही. भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमका प्रकार काय घडला होता?

पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला होता. गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.

नितेश राणे काय म्हणाले माहीत नाही, मी भाजपचा शिपाई आणि हिंदुत्ववादी नक्कीच : देवेंद्र फडणवीस

इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!

ठाकरे सरकार पळपुटं, वीज कापणं बंद होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा