आधीच हतबल असलेल्या बळीराजाला मोठा धक्का, बळीराजाला गोड पिकाची कडू आठवण कुणी दिली ?

| Updated on: Feb 27, 2023 | 3:05 PM

नाशिक शहरातील हा गुन्हेगारीचा प्रकार सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी घबराट निर्माण करणारा ठरला आहे. संशयित व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

आधीच हतबल असलेल्या बळीराजाला मोठा धक्का, बळीराजाला गोड पिकाची कडू आठवण कुणी दिली ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : द्राक्ष पंढरी ( Grapes City ) म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिक जिल्ह्यात परदेशातील अनेक व्यापारी हे नाशिकमध्ये येतात. द्राक्ष व्यापाऱ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक असते. नाशिक शहरातील पेठरोडवरील मार्केट मध्ये या व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशातच शरद पवार मार्केट ट्रान्सपोर्टमधून तब्बल दहा लाखांच्या द्राक्षाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलीस ( Nashik Police ) ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीचा मुद्दा समोर आला आहे.

नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात एका द्राक्ष व्यापऱ्याने दुसऱ्या व्यापऱ्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातून पुन्हा परस्पर द्राक्ष विक्री करण्याचा प्रकार समोर आल्याने द्राक्ष विक्रीच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे.

नाशिक शहरातील हा गुन्हेगारीचा प्रकार सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी घबराट निर्माण करणारा ठरला आहे. संशयित व्यापारी रमणजित सिंग सिंधू, जकतार सिंग, विक्रमजित सिंग यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

करणजीत सिंग कुलदीपसिंग औलक यांच्या तक्रारीवरन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार मार्केट यार्ड येथील गाळा क्रमांक पाच येथून ही परस्पर विक्री करण्यात आली आहे. त्यामध्ये काळा आणि हिरवा असे दोन्ही प्रकारचे द्राक्ष होते.

फेब्रुवारी महिन्यातील 21 आणि 25 तारखेच्या दरम्यान काळ्या आणि हिरव्या रंगाचा द्राक्ष माल भरून ठेवला होता. त्यावेळी व्यापारी औलक यांचा विश्वास संपादन करत ट्रकमध्ये माल भरून पोबारा केला आहे. यामध्ये जवळपास दहा लाखाहून अधिक किमितीचा माल होता.

ह्या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्ष माल विक्री करण्यासाठी धास्तावले आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणी काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.