सातारा: एप्रिल 2020 मध्ये देशात कोरोनाचा(Corona) कहर सुरु होता. सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन(Lockdown) जाहीर केला होता. कडक लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारचे आदेश धुडकावून सातारा(Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बंगल्यावर (Bungalow in Mahabaleshwar) पिकनिकला गेल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान(Wadhwan ) यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाधवान बंधूच्या महाबळेश्वर मधील बंगल्यावर CBI ची धाड(CBI Raids ) पडली आहे. या बंगल्यातून बंगल्यातून कोट्यावधींचे पेंटिंग्ज जप्त करण्यात आले आहेत.
महाबळेश्वर येथे वाधवन बंधूंचा वाधवान व्हिला हा बंगला आहे. या बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान बंधूवर आरोप आहे. CBI चे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर दाखल झाले. कोट्यावधींचे पेंटिंग्ज CBI ने ताब्यात घेतले आहेत.
वाधवान यांच्या बंगल्यात लावण्याते आलेले सर्व पेंटिंग्ज आणि पोर्ट्रेट परदेशी आहेत. हे सर्व पेंटिंग्ज,पोर्ट्रेट CBIने सील करून ताब्यात घेतले आहेत. या पेंटिंग्ज आणि पोर्ट्रेटची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येतेय. हे पेंटिंग्ज आणि पोर्ट्रेट कुठून आले? कसे आणले याचा तपास CBI चे अधिकारी करत आहेत. महाबळेश्वर येथे सुमारे 5 एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून पहिल्या कडक लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. याआधीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही बंधूंना महाबळेश्वरच्या बंगल्यात चौकशीसाठी आणले होते.तेव्हापासून वाधवान बंधू ताब्यात आहेत.
या कारवाईबाबत कोणालाही कुणकुण लागू देण्यात आली नव्हती. बंगल्यांची संपूर्ण दीड तास झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. सीबीआय पथकाच्या हाताला नक्की काय लागले, याविषयी प्रचंड उत्सुकता असून, पोलिसांनी या कारवाईबाबत मौन बाळगले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याविरोधात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सॉर्टियमची 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयकडे दाखल झालेला हा आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा बँकिंग फसवणुकीचा गुन्हा आहे.
प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवरुन वाधवान बंधूंना एक पत्र जारी करण्यात आले आहे. वाधवान बंधूंचा ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा उल्लेख करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच वाहनांसाठी विशेष पास जारी केला होता. या सर्वांना कौटुंबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली होती.