मुंबई : चैत्र नवरात्रौत्सवाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. घरोघरी देवी दुर्गा आणि कुलस्वामिनीच्या पूजेसाठी लगबग सुरु आहे. चैत्र नवरात्री चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होतो आणि नवमीला संपतो. यंदा चैत्र नवरात्रोत्सव 22 मार्चला सुरु होणार असून 30 मार्चपर्यंत असणार आहे. या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांची उपासना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी दुर्गा या काळात भक्तांमध्ये वास करते. तसेच पूजा उपासनेमुळे प्रसन्न होत भक्तांच्या इच्छा पूर्ण करते.
शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदू नव वर्ष 2080 विक्रम सांवत सुरु होणार आहे. नवरात्रोत्सव 30 मार्च 2023 रोजी रामनवमीला संपणार आहे. यावेळी देवी दुर्गा होडी या वाहनावर आरुढ होऊन येणार आहे. वाहनावरून वर्षाबाबत शुभ अशुभ संकेत वर्तवले जातात. होडी वाहन असल्याने यावर्षी खूप पाऊस होईल, अशी शक्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रोत्सवता तीन सर्वार्थ सिद्धि योग, अमृतसिद्धी योग आणि रवि योग यांची पर्वणी असणार आहे. 23, 27 आणि 30 मार्चला सर्वार्थ सिद्धी योग आहे. 27 आणि 30 मार्चला अमृत सिद्धी योग आहे. तर 24,26 आणि 29 मार्चला रवि योग असणार आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच राम नवमीला गुरु पुष्य योग आहे.
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. कलश स्थापना करण्यापूर्वी एका लाल कपड्यावर देवीची प्रतिमा स्थापित करा. त्यानंतर एका भांड्यात लाल माती टाकून गहू टाका. त्या भांड्यामध्ये कळश ठेवण्याची जागा ठेवाल.कलश मधोमध ठेवून मोलीने बांधाल आणि त्यावर स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढा.
कलाशाला कुंकू लावून टिळा लावा. कळश गंगाजलाने पूर्ण भरा. त्यानंतर कळशात सुपारी, फुलं, अत्तर, पाच रत्न, नाणी आणि पाच प्रकारची पानं ठेवा. पानं कळशाबाहेर राहतील याची काळजी घ्या. त्यावर थाळी ठेवून पूर्णपणे तांदळाने भरा.
लाल कपड्यात नारळ गुंडाळून रक्षासूत्राने बांधा. हा नारळ आपल्याकडे तोंड करून तांदळाने भरलेल्या थाळीवर ठेवा. देवीदेवतांना आव्हान करून कळश पूजा करा. कळशाला टिका लावा, अक्षता वाहा, फुलं वाहा, अत्तर आणि नैवेद्य आणि फळ-मिठाई अर्पण करा.तसेच गहू पेरलेल्या ठिकाणी नियमित पाणी टाका. एक दोन दिवसानंतर अंकुर फुटताना तुम्हाला दिसतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)