लातूर- तृतीयपंथी युवकासोबतच्या अनैतिक संबंधातून सुटका करून घेण्यासाठी मित्रानेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर-चापोली रस्त्यावर ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. याघटनेत सुदर्शन सूर्यवंशी या तृतीयपंथी युवकाचा मृत्यू झाला. चाकूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुनील राठोड या युवकाला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (Chakur Police arrested Rathode for murder of Sudarshan Suryawanshi)
संशयित आरोपी सुनील राठोड आणि मृत सुदर्शन सूर्यवंशी या दोघांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. दोघांमध्ये तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरुन वाद झाला. यावादातून सुनील राठोडनं सूर्यवंशीला मारहाण केली. आरोपी राठोडने सुदर्शन सूर्यवंशी याच्या डोक्यात काठीने मारहाण केली होती. यामध्ये सुदर्शन सूर्यवंशी गंभीर जखमी झाला. त्यानंतर सुनील राठोडनेच सूर्यवंशी याला बेशुद्धावस्थेत चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
मारहाणीत जखमी झालेल्या सुदर्शन सूर्यवंशी याला राठोडने चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुनील राठोडने त्यानंतर तेथून पलायन केले होते. रुग्णालयात सुदर्शन सूर्यवंशी याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चाकूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास करण्यात येत होतो. (Chakur Police arrested Rathode for murder of Sudarshan Suryawanshi)
चाकूर पोलिसांचा वेगवान तपास
सुदर्शन सूर्यवंशी यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्यानंतर चाकूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी यानंतर वेगवान तपास करुन आरोपी सुनील राठोडला अटक केली आहे.अनैतिक संबधातून सुटका करुन घेण्यासाठी हा प्रकार झाला, असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी सुरु केली असून आरोपीवर खूनाच्या कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Chakur Police arrested Rathode for murder of Sudarshan Suryawanshi)
धक्कादायक, अनैतिक संबधाला अडथळा ठरणाऱ्या युवकाचा खून, पोलिसांनी एका वर्षानंतर आवळल्या आरोपीच्या मुसक्या#aurnagabad #gangapurpolice #aurnagabadmurdercase @dattakanwate https://t.co/wIJjXE5RNq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या:
सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस
(Chakur Police arrested Rathode for murder of Sudarshan Suryawanshi)