चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते आहे. गडचिरोली (Gadchiroli News) येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे (Pankaj Bagde) वय 26, याचा मृतांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर हा भीषण अपघात झाला. बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघे मृत्युमुखी पडले. गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे 26 याचा मृतांमध्ये समावेश असून चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी करून गडचिरोलीला हे सगळे जण परतत होते. बोलेरोतील व्यक्ती, रात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक स्टेअरिंग रॉड तुटला आणि अचानक बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. घटनास्थळी सावली व किसान नगर येथील नागरिकांनी पोचत पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केलं.
गडचिरोलीतील अल्पावधीत आपली ओळख निर्माण केलेल्या पंकज बागडे या तरुणाच्या मत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. तर अन्य दोन तरुणांसह एका तरुणीचाही या अपघातात जीव गेला आहे. दरम्यान, या अपघातातून एक तरुण थोडक्यात बचावला आहे. मात्र आपल्यासोबत असेलल्या इतर चौघांच्या मृत्यूने या तरुणालाही मोठा धक्का बसलाय.
सुरेंद्र हरेंद्र मसराम वय 23 वर्ष रा.चिखली ता.सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सावली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. MH 33 A 5157 नंबरच्या महिंद्रा बोलेरो कारने चौघेजण परतत होते. पण वाटेतच काळाने घाला घातला. अपघातातील चौघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे.