सोशल मिडियावरील ‘तो’ मेसेज…फेरीवाले आणि साधूं-महतांना बसला फटका…

| Updated on: Sep 14, 2022 | 6:58 PM

सोशल मिडियावरील मेसेज या मारहाणीच्या घटनांना कारणीभूत तर नाही ना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करत असतांना त्यापासून आपल्याला कारवाई सामोरे जावे लागणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सोशल मिडियावरील तो मेसेज...फेरीवाले आणि साधूं-महतांना बसला फटका...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : सोशल मीडियाचे (Social Media) जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. कुठलीही पोस्ट (Post) शेयर करत असतांना त्या पोस्टबद्दल खातरजमा करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा एखाद्याला जीवाशी जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. अशाच घटना महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे देशभरात घडल्या आहेत. मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा मेसेज बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत होता. राज्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या नागरिकांनी तो वाचलाही आणि शेयर ही केला. मात्र, त्या मागील हेतु चांगला असला तरी त्याचा फटका साधू-महंत आणि फेरीवाल्यांना बसला आहे.

2018 मध्ये धुळ्यात मुलं पळवणारी टोळी म्हणून नागरिकांनी नाथपंथी असलेल्या गोसावी समाजाच्या भिक्षेकऱ्यांना बेदम मारहाण केली होती. त्यात एका भिक्षेकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता.

2020 एप्रिल महिन्यामध्ये पालघर येथे मध्यरात्री साधू-महतांवर गावकऱ्यांनी हल्ला केला होता, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही मुलं पळवणारी टोळी म्हणूनच मारहाण झाली होती.

या दोन मोठ्या घटना महाराष्ट्राला धडा शिकवणाऱ्या असतांना नाशिक आणि हिंगोलीमध्ये मुलं पळवणारी टोळी म्हणून बेदम मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहे.

नाशिकच्या टाकळीरोड परिसरात मुलं पळवणारी टोळी म्हणून ब्लँकेट विक्रेत्याला नागरिकांनी बेदम चोप दिल्याचे समोर आले. पोलीसांनी लागलीच घटनास्थळी भेट दिल्याने फेरीवाले असल्याचे बाब समोर आली.

हिंगोली येथे ही घडलेली घटनाही अगदी तशीच आहे. मुलं पळवणारी टोळी म्हणून साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे सोशल मिडियावरील मेसेज या मारहाणीच्या घटनांना कारणीभूत तर नाही ना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करत असतांना त्यापासून आपल्याला कारवाई सामोरे जावे लागणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील या घटना सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेशा आहेत, त्यामुळे येत्या काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी अपेक्षा करुयात.