अरे याला चोर म्हणावं की भुरटा, घराच्या तळघरातून केली चोरी पण दुसऱ्याच दिवशी… सगळेच झाले चकित!!

| Updated on: Apr 07, 2023 | 2:21 AM

एका व्यक्तीच्या घरातील मोठी रोख रक्कम चोरीला गेली होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी जे झालं त्याने गाव पडलंय विचारात!

अरे याला चोर म्हणावं की भुरटा, घराच्या तळघरातून केली चोरी पण दुसऱ्याच दिवशी... सगळेच झाले चकित!!
Follow us on

Crime News: आत्तापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक वेगवेगळ्या घटना ऐकल्या असतील. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की चोराने चोरी केल्यानंतर परत थोड्यावेळाने तो चोरी केलेला माल परत आहे त्या जागी आणून ठेवला. तुम्हाला हे ऐकून दोन मिनिटे धक्काच बसला असेल. पण हे खरं आहे बरं का. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे.

एक विचित्र चोरीची घटना बिल्हा परिसरात घडली आहे.  या परिसरातील एका व्यक्तीच्या घरातील मोठी रोख रक्कम चोरीला गेली होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी चोरीला गेलेली रक्कम परत आहे तशी मिळाली.

शोभाराम कोशले या व्यक्तीने गावातील त्यांची जमीन रोहित यादव नावाच्या व्यक्तीला विकली होती. 27 मार्च रोजी या जमिनीची नोंदणी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार शोभाराम कोशले यांना जमीन विकून रोख रक्कम मिळाली होती. या रोख रकमेपैकी 95 हजार रुपये शोभाराम यांनी त्यांच्या घराच्या तळघरात ठेवले होते. पण, दुसऱ्या दिवशी शोभाराम यांनी पाहिले असता पेटीसह संपूर्ण रक्कम चोरीला गेली होती.  या घटनेनंतर शोभाराम यांनी 1 एप्रिल रोजी बिल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

यानंतर असं काही घडलं की पोलीस आणि शोभाराम यांना मोठा धक्का बसला आणि आनंद देखील झाला. पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. अशातच अचानक शोभाराम यांना त्यांची रोख रकमेसह ती पेटी घराच्या अंगणात सापडली. या पेटीत पूर्ण 95 हजार रुपये होते. त्यामुळेच शोभाराम यांना सुखद धक्का बसला.

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना चोराने असं का केलं. तर या प्रकारावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, पोलीस आपल्याला पकडतील आणि आपल्यावर कारवाई करतील या भीतीने चोराने चोरीची पेटी संपूर्ण रक्कमेसह शोभाराम यांच्या घरी परत सोडली. मात्र, पोलीस आता या चोराचा शोध घेत आहेत.