परभणीः परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्टेशनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे भर उन्हात लहान मुलांना कामगारांप्रमाणे (Child Labor case) कामाला लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 14 वर्षे वयाखालील मुलांना शिक्षणाचा हक्क (Right to education) असून त्यांना कामावर ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही कायद्याचा भंग लहान मुलांना रेल्वे स्टेशन परिसरात भर उन्हात कामाला लावल्याचं उघडकीस आलं आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत रोड (Manwat Road station) येथील रेल्वेस्थानकात नांदेड-मनमाड या मार्गावर जुनी पटरी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या कामावर लहान मुलेही गिट्टी उचलण्याचे, रुळांना ऑइल लावण्याचे काम करत असल्याचे आढळले आहे. हा प्रकार पाहून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवतरोड येथील रेल्वे स्थानकात नांदेड-मनमाड या मार्गावर जुनी पटरी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी कंत्राटदाराने मध्यपर्देश येथील कामगार आणले आहेत. हे कामगार रेल्वे उड्डाणपुलाखाली कोप्या करून राहत आहेत. शोकांतिका म्हणजे संबंधित कंत्राटदार 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांकडून भर उन्हात काम करुन घेत आहे. ही अल्पवयीन मुले-मुली 39 अंश सेल्सियस तापमानात पटरीवरील गिट्टी उचलणे, रुळांना ऑइल लावणे अशी कामे करत असून रेल्वे प्रसासनाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रेल्वे विभागाकडून बालकांच्या होणाऱ्या शोषणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बाल कामगार बंदी नियमन कायदा 1986 नुसार, 14 वर्षाखालील मुलांचे जीवन आणि आरोग्यास घातक असलेल्या व्यवसायांमध्ये नोकरी देणे बेकायदेशीर आहे. अशा 65 व्यवसायांची यादी करण्यात आली आहे. ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. कायद्याचा भंग करणाऱ्यांना 3 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत 10 हजार ते 20,000 रुपये दंड होऊ शकतो.
इतर बातम्या-