नागरिकांनो सावधान, देशाची ही नऊ राज्ये बनली सायबर क्राईम हॉटस्पॉट

| Updated on: Mar 30, 2023 | 4:34 PM

सायबर क्राईम करणारे दुसऱ्या देशात बसून सायबर क्राईम करीत आहेत. चीन, पाकिस्तान तुर्की येथून सायबर गुन्हे केले जात आहेत.

नागरिकांनो सावधान, देशाची ही नऊ राज्ये बनली सायबर क्राईम हॉटस्पॉट
Cybercrime-1
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावधान रहायला हवे. देशातील राजधानी दिल्ली पासून ते आंध्रप्रदेश आणि गुजरातपासून आसामपर्यंत देशातील एकूण नऊ राज्यांमध्ये तीन डझनाहून अधिक गावे आणि शहरे आता सायबर गुन्ह्यांचे हॉटस्पॉट बनली आहेत. आधी झारखंडचे जामताडा हे सायबर क्राईमचे केंद्र मानले जायचे आता तर देशातील एक दोन नाही तर जामताडा सारखे आता तीन डझन केंद्रे सायबर गुन्ह्यांची मक्का बनली आहेत.

ऑनलाईन पद्धतीने व्यवहार वाढल्याने आता सायबर क्राईमची संख्या प्रचंड वाढली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनूसार देशात हरयाणा, दिल्ली, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्रप्रदेशमध्ये सायबर क्राईमचे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सावधान राहण्याची गरज आहे.

कुठे बनले आहेत हॉटस्पॉट ?

1. हरियाणाः मेवात, भिवानी, नूह, पलवल, मनोटा, हसनपुर, हथन गांव.

2. दिल्लीः अशोक नगर, उत्तम नगर, शकरपुर, हरकेश नगर, ओखला, आजादपूर

3. बिहारः बांका, बेगूसराय, जमुई, नवादा, नालंदा, गया.

4. असमः बारपेटा, धुबरी, गोलपाड़ा, मोरिगांव, नागांव.

5. झारखंडः जामताड़ा, देवघर.

6. पश्चिम बंगालः आसनसोल, दुर्गापुर.

7. गुजरातः अहमदाबाद, सूरत.

8. उत्तर प्रदेशः आजमगढ़.

9. आंध्र प्रदेशः चित्तूर.

कोण आहेत हे सायबर हल्लेखोर ?

देशातील वरील नऊ राज्यातील सायबर गुन्हे करणारे हे त्या राज्यातील नसून भारताबाहेरून कार्यरत आहेत, हे लोक भारताबाहेरून कारवाया करीत आहेत. यात चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान आदी देशातून सायबर हल्ले केले जात आहेत.

सरकार कशी ठेवतेय नजर

10 जानेवारी 2020 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोर्टल लॉन्च केले होते. ज्यावर सायबर क्राईमची तक्रार केली जाऊ शकते. गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सांगितले की आतापर्यंत 20 लाखांहून अधिक तक्रारी यावर आल्या आहेत. ज्याच्या आधारे एकूण 40 हजार एफआयआर दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या पोर्टल शिवाय सायबर क्राईम नोंदविण्यासाठी 1930 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हा हेल्पलाईन क्रमांक 250 पेक्षा जादा बॅंकांशी जोडलेला आहे. सायबर फसवणूक झाल्यास या हेल्पलाईनवर तक्रार करता येऊ शकते. सायबर क्राईमबाबत लवकर गुन्हे दाखल झाल्याने सायबर आरोपींकडून 235 कोटी रूपयांची वसुली करता येणे शक्य झाले आहे. ही रक्कम एकूण 1.33 लाख लोकांची फसवूणक करून हडपण्यात आली होती.

जामताडावर नेटफ्लिक्सवर वेब सीरीज

सीताराम मंडल हा बेरोजगार पित्याचा बेरोजगार मुलगा होता. 2010  मध्ये नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. त्याने रेल्वे स्थानकापासून रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या फेरीवाल्यांकडे काम केले. त्यानंतर एका कॉल सेंटरमध्ये जॉब लागल्यानंतर त्याचे आयुष्य बदलेले. त्यानंतर त्याने 2012  मध्ये तो जामताडा येथे परत आला. त्यानंतर त्याने फोनद्वारे फसवणूक सुरू केली, बॅंकेतून बोलत असल्याचे त्याने क्रेडीट व डेबिट कार्डचे डिटेल्स मागवले, ओटीपी मागून त्याने सगळ्याचे पैसे त्याच्याकडे वळते केले, 2016 मध्ये त्याला जामताडा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडे 12 लाख खात्यावर जमा होते, त्याने दोन पक्की घरे बांधली होती. 2020 में जामताडावर नेटफ्लिक्सवर वेब सीरीज आली होती.