मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिस ( Maharashtra Police ) दलाचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. मात्र, मालेगाव तालुक्यातील नागरिकांना काहीसा अजब अनुभव येत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ( Malegaon Crime ) वाढली आहे. अशातच दोघा तरूणांवर काही गुंडांनी हल्ला केला होता. गावकऱ्यांनी नंतर त्या गुंडांना पकडले देखील. मात्र पोलिसांनी त्यांना अजब सल्ला दिल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढलं आहे. ग्रामीण भागात चोरी करण्याबरोबरच हल्ला करण्याचा नवा पॅटर्न समोर आला आहे. याबाबतचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आले असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी हॉट आहे.
विशेष म्हणजे गावातील तरुण पोलिसांच्या हाती हल्लेखोरांना पकडून देत आहे. तरी देखील पोलिस कारवाई करत असून अजब सल्ला देत आहे. शिवीगाळ करत तुमच्यात दम नाही का ? असा सवाल करत आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
तालुका पोलिस ठाण्याच्या विरोधात नागरिक एकवटले आहे. कारवाई करण्याचे सोडून नागरिकांना अजब सल्ला दिला जात आहे. त्यावरून नागरिकांनी तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट अप्पर पोलिस आधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
अप्पर पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून चिखलओहोळ परिसरातील हल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यानिमित्ताने पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहे.
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, हल्ले अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.