सांगली : मोबाईलच्या स्टेटसवरुन सांगलीच्या कवठेमहांकाळ शहरातील औंधकर आणि पाटील या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. पाटील गटाने औंधकर यांच्या घरात शिरुन लोखंडी रॉड, विटा, दंडुक्याने मारहाण केली आहे. तर औंधकर गटाने पाटील गटातील अतुल पाटील, अनिकेत पाटील यांना मारहाण केली.
दोन्ही गटांनी परस्परांना विरोधात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश औंधकर, मीनाक्षी औंधकर, मनीष औंधकर,हे यामध्ये जखमी झाले आहेत. तर अनिकेत सुधाकर पाटील यांनीही औंधकर गटाविरोधात फिर्याद दिली आहे. अतुल पाटील व अनिकेत पाटील हे यामध्ये जखमी झाले आहेत.
मनीष औंधकर याने मोबाईलवरती अनिकेत पाटील याच्या विरोधात स्टेटस ठेवला होता. याचा राग अनिकेत पाटील याला आल्याने त्याने प्रशांत पाटील, सुधाकर पाटील, पांडुरंग पाटील, अतुल पाटील, दिनकर पाटील यांच्यासह 10 ते 15 जणांच्या टोळक्याने महेश औंधकर यांच्या काळे प्लॉट येथील घरावर हल्ला केला. व लोखंडी रॉड, लाकडी दंडुक्यांनी मारहाण केली. तसेच घरातील महिला, मुलींना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. औंधकर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून कवठे महांकाळ पोलिसांनी अतुल पाटील, दिनकर पाटील, सुधाकर पाटील, प्रशांत पाटील, अनिकेत पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह अनोळखी 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Clash Between Two Group in Sangali kavathe mahankal Over WhatsApp Status)
हे ही वाचा :
NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक
रेल्वेमध्ये 5 लाखांचे दागिने चोरले, बुलडाण्याच्या विहिरीत लपवले, 2 चोरट्यांस तीन महिन्यानंतर बेड्या