विरार / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : जमिनीच्या वादातून विरारमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. जमिन मालक, दुकान मालक, घर मालक या तिघांमध्ये तुफान राडा झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारच्या नारंगी पाडा परिसरात गुरुवार दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. विरार पोलिसांनी सध्या तरी कोणालाही ताब्यात घेतले नसून, सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वसई विरार महापालिकेने इमारतीचे डिमोलेशन केल्यानंतर जमिन मालक आणि इमारतीमधील दुकानं आणि रूम मालक यांच्यात ही हाणामारी झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दगड, लाठी, काठ्यांनी ही तुंबळ हाणामारी झाली आहे. यात दोन्ही गटातील लोकांना हाताला, पायला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. जमिन मालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये ही हाणामारी झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कल्याण पूर्वेकडील तिसगाव येथील साई साक्षी इमारतीमधील रहिवाशांचा आणि बिल्डरचा इमारतीच्या वॉल कंपाऊंडवरून वाद सुरू आहे. याच वादातून सोसायटी सदस्यांनी वॉल कंपाऊंड दुरुस्त करण्यासाठी माती आणून टाकली होती.
यामुळे सोसायटीचे सदस्य आणि संबंधित बिल्डरच्या साथीदारांमध्ये वाद झाला. या वादातून संबंधित बिल्डरच्या लोकांनी या ठिकाणी गोंधळ घालत सोसायटीचे सदस्यांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रहिवाशांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.