Ambernath Crime : कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीचा वाद विकोपाला गेला, मग दोन गटात फ्री स्टाईल जुंपली !

| Updated on: Aug 12, 2023 | 10:17 AM

दोन गट कारखान्यात लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गेले होते. यावेळी कॉन्ट्रॅक्टवरुन त्यांच्यात वाद झाला. मग हा वाद विकोपाला गेला आणि कारखान्याबाहेर राडा झाला.

Ambernath Crime : कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीचा वाद विकोपाला गेला, मग दोन गटात फ्री स्टाईल जुंपली !
अंबरनाथमध्ये क्षुल्लक कारणातून दोन गटात हाणामारी
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ / 12 ऑगस्ट 2023 : लेबर कॉन्ट्रॅक्टवरुन झालेल्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. यावेळी दोन गटात दगडफेककी करण्यात आली. इतकेच नाही कार अंगावर घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुंडांच्या या दंबगगिरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणातून हाणामारी आणि हल्ले करण्याचे प्रकार हल्ली वाढत आहेत. या घटनांवरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथ पश्चिमेतील के टी स्टील कंपनीच्या आवारात प्रियान फूड नावाचा कारखाना तयार करण्यात आला आहे. या कारखान्यात लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी फिर्यदी ऋत्विक गालफाडे आणि त्याचा सहकारी निजामुद्दीन शेख हे दोघे गेले होते. त्याचवेळी आरोपी मोनू बिष्टे, राकेश बिष्टे, बालाजी, विजय आणि इतर चार ते पाच अनोळखी इसमही कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गेले होते.

यावेळी काम मिळवण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले, एकमेकांवर दगडफेक केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. एका गटाकडून दुसऱ्या गटावर इनोव्हा कार अंगावर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर दुसऱ्या गटाकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी ऋत्विक गालफाडे याच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा