नाशिक : एकीकडे नाशिकमध्ये सर्वसामान्य नाशिककर चोऱ्या, दरोडे, हाणामारी, दुचाकी आणि चारचाकी चोरीच्या घटणेने हदारलेले असतांना दुसरीकडे जून नाशिक परिसरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुंडांमध्येच तुंबळ हाणामारी झाल्याने तिघे जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हाणामारीत हत्याराचा वापर झाल्याने एकाची पकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून नाशिक शहरातील गुन्हेगारी विश्वास खळबळ उडाली असून जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मध्यरात्रीच्या वेळी नाशिकच्या नानावाली येथील सुन्नी चौक ते ट्रॅक्टर हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास काही तरुण घोळका करून उभे होते. त्यातील काही तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
घोळका करून बोलत असतांना एकमेकांमध्ये काही शाब्दिक वाद झाले होते, त्यावरून त्यांच्यात थेट हाणामारीच झाली, यामध्ये एका जवळ हत्यार असल्याने त्याने हत्याराने वार केले होते.
गुन्हेगारांच्या तुंबळ हाणामारीत विनोद चौधरी उर्फ इल्या गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या हाणामारीत काही तडीपार गुंडाचा समावेश असून किशोर बाबूराव वाकोडे, ऋषभ दिनेश लोखंडे ऊर्फ डुबऱ्या हे दोघेही जखमी झाले आहेत, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहे.
या हाणामारीत ज्याने वार केले त्याच्या तडीपारीची मुदत नुकतीच संपली आहे. यामध्ये या हाणामारीचे कारण काय याची कबुली अद्याप पर्यन्त कोणीही दिली नसून पोलीस शोध घेत आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात याबाबत हाणामारीचा गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चोरांचा भद्रकाली पोलीस कसून तपास करत आहे.
दरम्यान या गुन्हेगारांच्या तुंबळ हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहे.