नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress president Sonia Gandhi) यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा(rape) गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. माधवन यांनी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून अद्याप मानधवन यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. नोकरीच्या शोधात असताना या महिलेची माधवन यांच्याशी ओळख झाली होती.
तक्रारदार महिलेचा पती काँग्रेसच्या कार्यक्रमात होर्डिंग्ज आणि पोस्टर लावण्याचे काम करायचा. तक्रादार महिला पतीसह काँग्रेसच्या कार्यक्रमांनाही जात होती. यादरम्यान महिला अनेकदा पक्ष कार्यालयातही गेली होती यामुळे अनेकांशी तिची ओळख झाली होती. 2020 मध्ये पतीच्या निधनानंतर तिची आर्थिक स्थिती बिकट झाली. मदतीच्या आशेने ती काँग्रेस कार्यालयात गेली तेव्हा तिथं कोणीतरी पीपी माधवन यांचा नंबर दिला.
महिलेने माधवन यांच्याशी संपर्क साधला. यानंतर माधवन यांनी या महिलेला सुंदर नगर येथील घरी नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले. तेथे महिलेची कागदपत्रे घेण्यासोबतच माधवनने तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. माझा घटस्फोट झाल्याचे सांगत माधवन यांनी या महिलेसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलद्वारे यांच्यात बोलणे सुरू झाले.
यानंतर माधवन यांनी एकदा रात्री अचानक भेटायला बोलावले. माधवनने तिला कारमध्ये बसवले आणि ड्रायव्हरला जाण्यास सांगितले. यानंतर त्याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला असता तो रागाच्या भरात निघून गेला असे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
दुसऱ्या दिवशी माधवनने महिलेला फोन करून माफी मागितली. त्यानंतर पूर्वीसारखे बोलू लागले. यानंतर पुन्हा एकदा माधवनने घरी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यानंतर माधवनचा घटस्फोट झाला नलसल्याचे या महिलेला समजले. माधवनने लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.