पाटणा : बिहारमधील गुन्हेगारीचे विश्वाची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे अनेक जण बिहारविषयी दबकून असतात. बिहारमधील गुन्हेगारी विश्वात वावरणारी लोकं कधी काय करतील सांगता येणार नाही. असाच अवैध दारु भट्टी चालवणाऱ्या टोळीचा खरा चेहरा उघडा केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये अनेक ठिकाणी त्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दारूबंदी करणारे बिहारमधील दारूमाफियांकडून अनेक वेगवेगळे डाव रचले जातात. असच एक प्रकरण मुझफ्फरपूरमध्ये घडले आहे.येथील दारू माफिया स्मशानभूमीत अवैध दारू भट्टी चालवत होते.
पोलिसांनी या भट्टीवर धाड टाकून गॅस सिलिंडर, कारखान्यातील 10 भांडी, 20 लिटर तयार देशी दारू, पाच लिटर स्पिरीट, मशिन आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूर स्मशानभूमीत सुरू असलेली अवैध दारूची भट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. येथे दारू माफिया रात्रीच्या अंधारात देशी दारू तयार करत होते.
दारू माफिया करणारे रात्रीच्या वेळी हे काम स्मशानभूमीत करत होते. त्यामुळे स्मशानभूमीकेड बघणाऱ्या लोकांना वाटायचे की, स्मशानभूमीत मृतदेह जळत आहे. मात्र तिथे धाड टाकल्यानंतर पोलिसांना समजलं की, त्याठिकाणी काही जण दारू बनवण्याचे काम करत आहे.
हे प्रकरण माधोपूर-सुस्ता पोखर येथे घडले आहे. येथील स्मशानभूमीत वर्षानुवर्षे दारूचा कारखाना सुरू होता. यावेळी स्मशानभूमीत देशी दारू बनवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच स्मशानभूमीतील सगळा दारु अड्डा उद्धवस्त करण्यात आला.
याआधी डिसेंबरमध्येही उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छपरा येथील बलवा दियारा येथे छापा टाकला होता. पाच तास चाललेल्या या कारवाईत 5 अवैध दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. छापा टाकणाऱ्या पथकाने मोठ्या प्रमाणात कच्ची दारू जप्त केली.
दारुसाठी वापरले गेलेले ड्रम खोल खड्यात लपवून ठेवले होते. छाप्यादरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अनेक ठिकाणी युरियाही सापडला. त्याचा वापर वाईन बनवण्यासाठी केला जात असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.