थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने, थाटामाटात त्यांचं लग्न झालं, वधूने गृहप्रवेशही केला. नंतर इतर जोडप्यांप्रमाणेच दोघंही हनीमूला देखील गेले, काश्मीरचं सौंदर्य अनुभवायचा त्यांचा प्लानही होता. मात्र तिथे गेल्यावर बायकोसबत फिरण तर दूरच राहिलं, पती सतत मोबाईल घेऊनच बसलेला दिसला. ते पाहून वधूचं डोकं फिरलं आणि लग्नाच्या काही दिवसांतच त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. ते कमी की काय म्हणून त्या पतीने त्याच्या पत्नीला मारहाणही केली, असा आरोप तिने केला. पण कसाबसा त्यांनी वाद मिटवला. आता सगळं नीट होईल असं वाटत असतानाच दोघे घरी परतले, पण तिथे गेल्यावर सासरच्या लोकांनी नव्या सूनेचा एवढा छळ केला, तिला टॉर्चर केलं की हे लग्न आता मोडण्याच्याच बेतात आहे.
हरिदवारमधील ज्वालापूर येथील ही दुर्दैवी घटना आहे. तेथे राहणारी एक तरूणी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि रडत-रडतच तिने तिची दु:खद कहाणी पोलिसांना सांगितली. अवघ्या 8-9 महिन्यांपूर्वी, डिसेंबर 2023 मध्ये त्या युवतीचं हरियाणातील अंबाला येखील अंकुर या तरूणाशी अरेंज मॅरेज झालं. पतीचं घर आपलं मानून राहू, सुखाने संसार करू अशी स्वप्न रंगवत ती हनीमूसाठी काश्मीरला गेली.
हनीमूला जाऊनही पती फोनलाच चिकटलेला
पण तिथे गेल्यावर तिची सर्व स्वप्न तुटली. ती विवाहित महिला म्हणाली- ‘हनिमून दरम्यान माझा नवरा अनेकदा मोबाईलवरच असे, नेहमी कोणाशी तरी बोलत असे. मी विचारल्यावर तो सांगायचा की मित्रांशी बोलतोय. आधी मला ते खरं वाटलं, पणण दिवस असो वा रात्र, तो मोबाईलवरच असायचा. एके दिवशी तो बाथरुमला गेला तेव्हा मला त्याचा मोबाईल चेक केला, ते पाहून मला धक्काच बसला. माझे पती एका मुलीशी चॅटिंग करत होते. एकमेकांना कसले-कसले मेसेजस त्यांनी पाठवले, फोनवरही बोलणं झालं होतं. माझ्या पतीचं त्या मुलीशी अफेअर सुरू असल्याचं तेव्हाच माझ्या लक्षात आलं’ असं ती म्हणाली.
‘ माझा नवरा बाथरूममधून बाहेर येताच मी त्याला याबाबत विचारले. त्यानंतर पतीने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. नुकतेच लग्न पार झालं होतं, त्यामुळे हे नात जोडून ठेवण्यासाठी मी त्याला माफ केलं. पण आम्ही घरी परतल्यावरही माझ्या पतीचं वागणं काही सुधारलं नाही. त्या मुलीशी बोलताना मी पुन्हा त्यांना रंगेहात पकडलं. ती गोष्ट उघड करून विरोध केला, तर माझ्या सासरचे लोकं मला छळत होते, टॉर्चर करू लागले. एके दिवशी तर माझे सासू-सासरे आणि पतीने मला बेदम मारहाण केली आणि घरातूनचा बाहेर काढून टाकलं. त्यांनी माझ्याकडे हुंडाही मागितला. त्यानंतर माझे माहेरचे मला घरी घेऊन आले ‘ अशी आपबिती तिने सुनावली.
हुंडाही मागितला
तेव्हापासून ती तरूणी तिच्या माहेरीच राहत आहे. काही दिवसांनी सर्व ठीक होईल अशी तिला आशा होती, पण त्या दिवसापासूनच सासरच्या कोणत्याही व्यक्तींनी तिला फोन केला नाही की कोणी तिला घ्यायलाही आलं नाही. तिने घरी फोन केल्यावर त्यांनी थेट तिच्याकडे हुंडाच मागितला.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. विवाहित महिलेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आणि सासरच्या लोकांची चौकशी केली जाईल. आरोप खरे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.