अहमदनगर : पती-पत्नीमधील (Husband Wife Dispute) वादांचे खटले न्यायालयासाठी (Court Decisions) नवे नाहीत. अशाच एका अजब खटल्याची गजब गोष्ट समोर आली आहे. प्रकरण अहमदनगरमधील (Ahmednagar News) आहे. अहमदनगर कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार, पारंपरिक पद्धतीला छेद देणारा आदेश देण्यात आलाय. कारण एका पतीला कोर्टाने चक्क पत्नीच्या घरी नांदायला जाण्याचे आदेश दिले आहे. हा ऐतिहासिक निकाल नेमक्या कोणत्या प्रकरणी देण्यात आला आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात.
अहमदनगर न्यायालयात पती पत्नींच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. या निकालाचा कौंटुबिक न्यायालयात भविष्यात दाखला दिला गेला, तर आश्चर्य वाटायला नको. अहमदनगर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, एका पतीला चक्क पत्नीच्या घरी म्हणजेच सासरी राहायला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पत्नी पत्नीच्या वादावर अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिलाय.
विवाहानंतर खरंतर मुलगी सासरी म्हणजे मुलाच्या घरी नांदायला जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लग्नानंतर मुलीने मुलाच्या घरी राहायला जाणं, ही एक नॉर्मल गोष्ट आहे. पण आता एका पतीला पत्नीच्या घरी नांदायला जावं लागणार आहे. कोर्टानेच तसे आदेश जारी दिले आहेत.
एका उच्चशिक्षित दाम्पत्यामधील वाद कोर्टात गेला होता. हे दाम्पत्य सरकारी नोकरीत कामाला आहे. पण पत्नी पतीच्या घरी नांदायला जात नव्हती. त्यामुळे पत्नीविरोधात पतीने कोर्टात दाद मागितली होती. नगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात याप्रकरणाचा खटला सुरु होता. त्यावर कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.
पत्नी माझ्याकडे राहिला येत नाही, अशी तक्रार पतीने दाखल केली होती. तर माझी बदली होत नाही असं म्हणणं पत्नीने मांडलं होतं. या खटल्यात वकील भगवान कुंभकर्ण आणि वकील शिवाजी सांगळे यांनी विवाहित महिलेची मांडली बाजू होती. या खटल्यातील तक्रारदार पती शिक्षक असून महिला कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने पतीला फटकारलंय. चक्क पतीनेच पत्नीकडे राहायला जावं, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.