नालासोपारा : नालासोपाऱ्यात (Nalasopara) गोळीबाराचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. नालासोपारा परिसरात पुन्हा गोळीबाराची एक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा (Nalasopara) पूर्व संतोष भुवन परिसरात रविवारी, रात्री 10 वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात सख्या मेहुण्यानेच भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भावोजी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नालासोपाऱ्याच्या पूर्व संतोष भुवन परिसरात झालेल्या गोळीबारात हितेन जोशी, हा जखमी असून, दीपक गौतम असे आरोपीचे नाव आहे. जखमी आणि आरोपी यांचे मेहुणे-भावोजीचे नाते आहे. कौटुंबिक वादविवादाच्या कारणातून मेहुण्याने भावोजीवर दोन गोळ्या फायर केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्व संतोष भुवन शर्मावाडी या परिसरात रविवारी, रात्री 10च्या सुमारास दोघांनी पायी चालत येऊन फायरिंग केली. यानंतर ते लगेच फरार झाले.
नोलासोपाऱ्यातून सैराट चित्रपटातील पटकथेची पुनरावृत्ती झाल्याची प्रचिती येते. पूर्व संतोष भुवन परिसरातील शर्मावाडीमध्ये राहणाऱ्या हितेन जोशी याने एका मुलीशी तिच्या घरच्यांविरोधात जाऊन लग्न केले होते. यावरून मुलीच्या घरच्या मंडळींनी त्याला धमकावले. आठ महिन्यांपूर्वी मुलीचा भाऊ दीपक गौतम याने हितेनला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. यावेळी हितेन याने पोलिसात तक्रार दिली होती. यानंतर दीपकने हितेनचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी, रात्री 10 वाजता दीपकने संधी साधत बंदुकीतून दोन गोळ्या झाडून हितेनची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, हितेन यातून वाचला असून त्याच्यावर उपाचार सुरु आहेत.
इतर बातम्या